Delhi Liquor Scam | मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत २६ जुलैपर्यंत वाढ
पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने शुक्रवार २६ जुलैपर्यंत त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे.
के. कवितांना सुनावणीला हजर राहण्याचे आदेश
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात बीआरएस नेत्या के.कविता यांच्यावर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. यानंतर दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने के. कविता यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेतली आहे. कोर्टाने के. कविता यांना २६ जुलै रोजी दुपारी २ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सिसोदियांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक
मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत २२ जुलै रोजी संपत होती. या कारणास्तव त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. यापूर्वी 15 जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सिसोदिया यांना 22 जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती.
के.कवितांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते
बीआरएस नेत्या कविता यांना गुरुवारी (१८ जुलै) एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांच्याविरूद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आणि २६ जानेवारीला सादर करण्यास सांगितले. के. कविता यांची प्रकृतीही ठीक नाही. स्त्रीरोग तपासणीसाठी त्यांना गुरुवारी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजी (एम्स) येथे पाठवण्यात आले. तत्पूर्वी, तीव्र तापामुळे कविता यांना मंगळवारी दीनदयाल उपाध्याय (डीडीयू) रुग्णालयात नेण्यात आले होते.

