Delhi CCTV Removal: खामेनींचे उदाहरण... चीनचे कारण... दिल्ली सरकार तब्बल १.४ लाख CCTV हटवण्याच्या तयारीत

Delhi CCTV Removal
Delhi CCTV RemovalPUDHARI
Published on
Updated on

Delhi CCTV Removal: दिल्ली सरकार देशाच्या राजधानीत लागलेले तब्बल १.४ लाख सीसीटीव्ही हटवण्याच्या तयारीत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारमधील लोक निर्माण विभागाचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी बुधवारी दिल्लीतील सीसीटीव्ही कॅमेरे टप्याटप्याने हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अशी माहिती दिली. त्यांनी हे सीसीटीव्ही कॅमेरे आम आदमी सरकारच्या काळात लावण्यात आले होते असं सांगितलं.

Delhi CCTV Removal
US Iran Isreal Conflict: खामेनींच्या खात्म्यामागची कहाणी

दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार PWD अंतर्गत राजधानी दिल्लीत दोन टप्यात एकूण २ लाख ७४ हजार ३८९ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. यातील पहिल्या टप्यात २०२० के २०२२ या काळात १ लाख ४० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. तर दुसऱ्या टप्यात जून २०२५ ते मार्च २०२६ मध्ये १ लाख ३४ हजार ३८९ सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते.

दिल्लीत पहिल्या टप्यात लावण्यात आलेले सर्व कॅमेरे हे चीनच्या हिकविजन कंपनीचे होते. या कंपनीच्या कॅमेऱ्यांबाबत संपूर्ण जगभारत सुरक्षेच्या बाबतीत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Delhi CCTV Removal
Ali Larijani killed: मुलीच्या घरी पाहुणे म्हणून गेले होते अली लारीजानी; इस्रायलने इराणच्या 'चाणक्याला' कसं उडवलं?

राष्ट्रीय सुरक्षेशी संबंध

माध्यमांशी बोलताना प्रवेश वर्मा यांनी सांगितलं की, आम आदमी पक्षाने राजधानी दिल्लीत हिकविजनचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सुरक्षेचा दीर्घकालीन विचार करण्यात आला नव्हता. सर्व्हेलन्स फक्त दिखाव्यासाठी करायचा नसतो. हा विषय संवेदनशील डेटाच्या नियंत्रणाशी संबंधित आहे.

प्रवेश वर्मा यांनी ही काही सामान्य खरेदी प्रक्रिया नाहीये. ज्यावेळी तुम्ही संपूर्ण शहरात अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करता त्याचा थेट संबंध राष्ट्रीय सुरक्षेशी असतो. दुर्दैवानं आम आमदी पार्टी याबाबत गंभीर नाही.

त्यांनी सांगितलं की चीनी बनावाटीच्या या कॅमेऱ्यांना टप्या टप्याने आधुनिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोणातून अजून चांगल्या कॅमेऱ्यांनी रिप्लेस केले जातील. प्रवेश वर्मा यांनी पहिल्या टप्यात ५० हजार चीनी सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्याला मंजूरी दिली आहे.

Delhi CCTV Removal
Ayatollah Ali Khamenei Attack: ट्रम्पना 'राजी' करणारे राजपूत्र, मोबाईल टॉवर- CCTV हॅक अन् 200 विमाने; इराण हल्ला Decode

चीनी कंपन्यांच्या कॅमेऱ्यांवर आक्षेप का?

सीसीटीव्ही कॅमेरे तयार करणाऱ्या चीनी कंपन्यांचे सरकारशी संबंध आहे. अनेक देशांना अशी शंका आहे की या कंपन्या रेकॉर्ड केलेला डेटा हा चीन सरकारला पाठवतात. यामुळं हेरगिरीचा धोका निर्माण होतो. अनेक देशांनी हिकविजनच्या उपकरणांवर सरकारी संस्थाद्वारे वापर करण्यावर बंदी घातली आहे.

नुकतेच इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांची इस्त्रायलकडून हत्या करण्यात आली. त्यावेळी मोसादने इराणच्या रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे हेरगिरी केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करून त्याचा वापर हेरगिरीसाठी होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news