महिला दिनी दिल्ली सरकारची मोठी भेट ! शहरातील महिलांना दरमहा मिळणार २५०० रूपये !

Mahila Samridhi Yojana | 'महिला समृद्धी योजनेला' दिल्ली कॅबिनेटची मंजुरी
Mahila Samridhi Yojana
महिला दिनी दिल्ली सरकारची मोठी भेट ! शहरातील महिलांना दरमहा मिळणार २५०० रूपये !Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजधानी दिल्लीतील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्लीत नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने महिला समृद्धी योजनेला मंजुरी दिली आहे.सरकारने एका वर्षासाठी ५,१०० कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे दिल्ली शहरातील महिलांना आता दरमहा २५०० रूपये मिळणार असल्याचे समोर आले आहे.

महिला दिनानिमित्त दिल्लीतील महिलांना भाजप सरकाने मोठे गिफ्ट दिले आहे. महिला दिनी मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे, असे माध्यमांशी बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज (दि.८) सांगितले. यावेळी रेखा गुप्ता म्हणाल्या, "आज महिला दिन आहे. आज आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि आमच्या मंत्रिमंडळाने या योजनेला मान्यता दिली आहे. दिल्ली निवडणुकीदरम्यान भाजप सरकारने महिलांना २५०० रुपये देण्याचे वचन दिले होते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आम्ही दिल्लीच्या अर्थसंकल्पात ५१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आम्ही समिती स्थापन केली आहे, ज्याचे नेतृत्व मी करेन आणि या योजनेसाठी नोंदणी लवकरच सुरू होईल. तसेच लवकरच एक पोर्टल सुरू केले जाईल...", असे देखील त्या म्हणाल्या.

कोणत्या महिला असणार पात्र असतील?

दिल्ली राज्यातील ज्या महिला दिल्लीच्या मतदार आहेत आणि त्यांचे वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. यात महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. ज्या महिला आधीच इतर कोणत्याही सरकारी आर्थिक योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ओळख पडताळणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे आणि लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी जोडणे अनिवार्य आहे.

महिला समृद्धी योजनेवरून विरोधकांनी घेरले होते

दिल्ली सरकारने त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत ही योजना का मंजूर केली नाही, असा प्रश्न आप नेत्या आतिशी यांनी विचारल्यानंतर काही तासांतच ह घोषणा करण्यात आली आहे. आदल्या दिवशी, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी नव्याने स्थापन झालेल्या भाजप सरकारवर "महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वचन पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news