Delhi Crime: दिल्लीत पुन्हा निर्भया प्रकरण...? खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप

Delhi Crime
Delhi Crimepudhari
Published on
Updated on

Delhi crime private bus Women Molestation:

नवी दिल्लीत पुन्हा एकदा निर्भया प्रकरण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील एका खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून राणीबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली बस देखील ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा सर्व अँगल्सने तपास सुरू केला आहे.

Delhi Crime
Chhatrapati Sambhajinagar crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी

तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की महिलेने केलेल्या तक्रारीवरून बस चालक आणि कंडक्टर या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच खासगी बस देखील ताब्यात घेतली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पीडित महिला ही विवाहित असून तिला तीन मुलं देखील आहेत असं सांगितलं.

बातमी अपडेट होत आहे....

Delhi Crime
Yavatmal Crime : फोटो काढण्याच्या बहाण्याने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आर्णी पोलिसांकडून दोघांना अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news