Chhatrapati Sambhajinagar crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी

तरुणाविरुद्ध सोमवारी (दि.११) सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल
 Harassment
Harassmentfile photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने अत्याचार केला. त्यानंतर त्याने तरुणीशी लग्नाला नकार देत तक्रार केली तर खासगी फोटो व्हायलर करण्याचीही धमकी दिली.

हा प्रकार १८ ऑक्टोबर २०२४ ते २२ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी तरुणाविरुद्ध सोमवारी (दि.११) सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरपूर एसआरपीएफमध्ये तैनात नितेश राम चव्हाण (रा. ताबेळा, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे.

 Harassment
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

२२ वर्षीय पीडिता जालना जिल्ह्यातील आहे. २०२३ मध्ये ती पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी शहरात आली होती. त्याच दरम्यान नितेश हादेखील पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी शहरात आला होता. ती एन १२, स्वामी विवेकानंदनगर भागात तर तो सुदर्शननगर, टीव्ही सेंटर भागात रुम करून राहात होते.

यादरम्यान त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. तेव्हा ती अनेक वेळा त्याच्या खोलीवर डबा घेऊन जायची. २०२४ मध्ये नितेश राज्य राखीव पोलिस दल, नागपूर येथे भरती झाला. ऑक्टोबर २०२४ मध्ये नितेशने तिला प्रशिक्षण पूर्ण झाले की, आपण लग्न करू असे आश्वासन दिले.

विरोधानंतरही संबंध

१८ ऑक्टोबर २०२४ रोजी पीडिता नितेशचा डबा घेऊन त्याच्या खोलीवर गेली. तेंव्हा त्याने तिच्यासोबत जवळीक साधली. तिने विरोध केला, मात्र त्याने पोलिस दलात भरती झाल्याचे सांगत लग्नाचे आमिष दाखवून बळजबरी तिच्यासोबत संबंध ठेवले. त्यानंतर कधी त्याच्या खोलीत तर कधी तिच्या खोलीत तो तिच्यासोबत शरीरसंबंध करायचा.

 Harassment
Dombivli murder : डोंबिवलीत नळ चालू ठेवल्याचा जाब विचारल्याने हत्या

रोझ गार्डनसमोरील लॉजवरही दोनवेळा त्याने तिच्यावर अत्याचार केला. या दरम्यान त्याने तिचे गुपचूप फोटो काढले होते. लग्नाला नकार देत त्याने हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती गायके करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news