

Delhi Mother Son Crime
नवी दिल्ली : दिल्लीत 39 वर्षीय तरुणाने 72 वर्षांच्या आईवर दोन वेळा बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 'लहान असताना आईचे अनैतिक संबंध होते', या संशयातून विकृत मुलाचे आईसोबत खटके उडत होते आणि तिला या 'कथित अनैतिक संबंधां'ची शिक्षा देण्यासाठीच त्याने हे कृत्य केल्याचा आरोप आहे.
दिल्लीतील मध्यवर्ती भागात 72 वर्षीय महिला तिच्या सेवानिवृत्त पती, मुलगा आणि मुलीसह राहते. जुलैमध्ये वयोवृद्ध पीडित महिला, तिच्या पती आणि मुलीसह सौदी अरेबियात यात्रेसाठी गेली होती. तिथे असतानाच मुलाने वडिलांना फोन केला आणि 'आईला तातडीने घटस्फोट द्या, तिचे चारित्र्य चांगले नाही' असे सांगितले. तिथून परतल्यावर पीडित महिलेच्या पदरी नसावं
1 ते 14 ऑगस्ट दरम्यान काय घडलं?
1 ऑगस्ट: यात्रेवरून परतल्यावर तरुणाने आईला मारहाण केली होती. 'बुरखा काढ' असं म्हणतं मुलाने आईला बेदम मारहाण केली होती. यानंतर पीडित महिला मोठ्या मुलीच्या घरी निघून गेली.
11 ऑगस्ट: पीडित महिला पुन्हा स्वगृही परतली. त्यावेळी मुलाने 'आईशी एकट्यात बोलायचं आहे, आमच्यातले वाद आम्ही एकटे सोडवू' असं सांगत आईला दुसऱ्या खोलीत नेले. यानंतर मुलाने पुन्हा आईशी वाद घातला आणि चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार रात्री साड नऊच्या सुमारास घडला. भीती आणि लज्जेपोटी महिलेने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
14 ऑगस्ट: तीन दिवसांनी पुन्हा एकदा मुलाने तिच्यावर बलात्कार केला. शेवटी पीडितेने हा प्रकार मुलीला सांगितला आणि 24 वर्षांची मुलगी आईला घेऊन दिल्लीत पोलीस ठाण्यात पोहोचली.
मुलाच्या लहानपणी आईचे अनैतिक संबंध होते, असा संशय आरोपीला होता आणि त्यामुळे बालपण वाईट गेलं, असं आरोपीचं म्हणणं होतं. आरोपी हा बेरोजगार असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त निधिन वालसन यांनी सांगितले.