दिल्ली विमानतळाच्या छत कोसळले; एकाचा मृत्यू, ५ जखमी

बचाव कार्य सुरु
 Terminal-1 of Delhi airport
दिल्ली विमानतळाच्या छताचा काही भाग वाहनांवर कोसळल्याने ६ जखमी File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर  मुसळधार पावसात विमानतळाच्या टर्मिनल-1 च्या छताचा काही भाग गाड्यांवर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर पाचजण जखमी झाले आहेत तर अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. Delhi airport

एकाचा मृत्यू, ५ जखमी

माहितीनुसार दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-१ च्या छताचा काही भाग आज (दि.२८) सकाळी मुसळधार पावसात गाड्यांवर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर पाचजण जखमी झाले आहेत, तर अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना सकाळी ५ च्या सुमारास घडली.  दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) अधिकाऱ्यांनी सांगितले, भारतातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनलच्या पिक-अप आणि ड्रॉप एरियामध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचे छताचे पत्रे आणि सपोर्ट बीम कोसळले.

 Terminal-1 of Delhi airport
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाची संयमाने प्रतीक्षा करा

दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे प्रवक्ते (DIAL) म्हणाले, "आज पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ च्या जुन्या डिपार्चर फोरकोर्टच्या छताचा काही भाग पहाटे ५ च्या सुमारास कोसळला. यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे आणि आपत्कालीन कर्मचारी काम करत आहेत. या घटनेमुळे प्रभावित झालेल्यांना सर्व आवश्यक सहाय्य आणि वैद्यकीय मदत प्रदान करण्यासाठी, टर्मिनल 1 वरून सर्व निर्गमन तात्पुरते निलंबित केले गेले आहेत आणि सुरक्षा उपाय म्हणून चेक-इन काउंटर बंद आहेत आणि कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत."  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news