Delhi AAP : स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण ; केजरीवालांच्या आई-वडिलांची होणार चौकशी

Delhi AAP
Delhi AAP

पुढारी ऑनलाईन डेस्क: आप खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या तपासाचा धागा आता केजरीवाल यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचला आहे. मालीवाल यांनी केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी (Delhi AAP)  मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिल्ली पोलीस आज (दि.२३ मे) अरविंद केजरीवाल यांच्या आई-वडिलांची चौकशी करणार आहेत.

प्रकरणावर गेल्या आठवड्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर बिभव कुमार यांना अटक करण्यात आली होती. AAP सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांच्या आई-वडिलांना दिल्ली पोलिसांना आज सकाळी ११:३० वाजता त्यांच्या मुलाच्या सिव्हिल लाइन्स भागातील निवासस्थानी भेट (Delhi AAP) देण्यास सांगितले आहे.

माझ्या वृद्ध, आजारी आई-वडिलांची चौकशी- केजरीवलांची माहिती

बुधवारी केजरीवाल म्हणाले की, गुरुवारी दिल्ली पोलीस येऊन त्यांच्या वृद्ध आणि आजारी आई-वडीलांची चौकशी करतील. मालीवाल 'हल्ला' प्रकरणी पोलिस केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचीही चौकशी करू शकतात. तसेच दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांचे आई-वडिल आणि पत्नी यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जबाब नोंदवण्यासाठी वेळ (Delhi AAP) मागितला होता, असेही सूत्रांनी सांगितले आहे.

हे भाजपचे षड्यंत्र- मंत्री आतिशींचा आरोप

अरविंद केजरीवाल यांच्या आई वडिलांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. वृद्ध माता-पित्यांना त्रास दिला जात आहे, याचे उत्तर पंतप्रधान देतील का, हे सारे भाजपचे षड्यंत्र आहे. असा आरोप आप मंत्री आतिशी यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news