

Bihar Cabinet deepak prakash minister:
बिहारमधील राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा यांनी त्यांचा मुलगा दीपक प्रकाश यांच्या नावाची शिफार पक्षाच्या कोट्यातून मिळालेल्या एकमेव मंत्रीपदासाठी केली. मात्र या शिफारसीमुळं सर्वांनाच धक्का बसला कारण दीपक प्रकाश हे ना विधानसभेचे ना विधानपरिषदेचे आमदार आहेत.
ज्यावेळी एनडीएचे जागावाटप झालं त्यावेळी कुशवाहा हे नाराज दिसत होते. त्यांच्या पक्षाला ६ जागा मिळाल्या होत्या. त्यांना एक विधानपरिषदेची सीट देण्याचे देखील आश्वासन देण्यात आलं होतं.
बिहारच्या मंत्रीमंडळात अनेक नवे चेहरे आहेत. त्यात उपेंद्र कुशवाहा यांच्या मुलानं दीपक प्रकाश यांनी देखील शपथ घेतली आहे. दरम्यान, मंत्री झाल्यानंतर आज माध्यमांनी दीपक यांच्याशी बातचीत केली.
त्यावेळी दीपक प्रकाश म्हणाले, 'मी राजकारणात नाही. मात्र मी लहानपणापासून राजकारण जवळून पाहिलं आहे. लोकांना काम करताना पाहिलं आहे. मी अनेक राजकीय कामात सहभाग घेतला आहे. मंत्रीपदासाठी माझं नाव का निश्चित केलं गेलं ते उपेंद्र कुशवाहाजी सांगतील. शपथ घेण्यापूर्वी आधी मला मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे याची माहिती मिळाली.
दीपक प्रकाश यांनी युवकांसाठी काम झालं पाहिजे असं सांगितलं. ते म्हणाले, 'लोकांच्या मनातील शंका कमी करण्यासाठी, नोकरी आणि रोजगारावर काम करण्यात आलं आहे. आगामी पाच वर्षात देखील नोकरी आणि रोजगारावर काम करणार आहे. जवळपास ३० लाख रोजगार निर्मिती करायची आहे. आमच्या राज्यातील युवकांना चांगला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आधुनिक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे.
दीपक प्रकाश पुढं म्हणाले की, 'मी सॉफ्टवेअर इंजिनिअर राहिलो आहे. आयटी सेक्टरमध्ये चार वर्षे काम केलं आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून मी राजकारणात सक्रीय झालो आहे. मी युवकांसाठी काम करू इच्छितो. अनेक रोगांचा एक उपाय म्हणजे शिक्षण त्यामुळं मला शिक्षणावर काम करायचं आहे.