वसंत भोसले
मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये देखील महिलांसाठी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा मोठा परिणाम बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आला त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा मतदान करण्यात आले.
बिहार विधानसभा निवडणूक ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध महाआघाडी यांच्यात अटीतटीची होईल, नव्याने स्थापन झालेल्या जनसुराज पक्षाचा कोणताही प्रभाव दिसणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण तो फोल ठरला. निवडणूक एकतर्फी झाली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्रचंड बहुमताने बिहारच्या मतदाराने निवडून दिले.
बिहार विधानसभेची निवडणूक जवळ आली असताना फेब्रुवारीमध्ये मांडलेल्या अंदाजपत्रकात अनेक योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याशिवाय बिहार सरकारने गेल्या चार महिन्यांमध्ये 26 वेगवेगळ्या योजना जाहीर करून थेट लाभ देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशप्रमाणेच लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची योजना आखण्यात आली होती. त्याच धर्तीवर बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना तयार केली आणि प्रत्येक महिलेला रोजगार सुरू करण्यासाठी दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले.
खास या योजनेसाठी एक कोटी 25 लाख महिलांची यादी तयार करण्यात आली होती. त्याशिवाय शेतकरी, शेतमजूर रिक्षा चालक यांच्यासाठी; शिवाय बेरोजगार पदवीधर, पदविकाधारक, बारावी पास असलेल्या सर्व तरुणांना आर्थिक लाभ देण्यात आला होता. त्याचा परिणाम बिहारमधील मतदानामध्ये भरघोस वाढ झाली आणि ते सर्व मतदान राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळाले. त्यामुळेच न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे बहुमत या आघाडीला मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सुमारे दोन डझन नेत्यांनी संपूर्ण बिहार पिंजून काढला. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलास मत म्हणजे पुन्हा एकदा जंगल राज येण्यासाठी निमंत्रण देणे असा प्रचार करण्यावर नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक भर दिला होता. गृहमंत्री अमित शहा यांनी मतदार यादींचे फेरसर्वेक्षण आणि घुसकरांची मते घुसखोरांची मते यावर प्रचारात भर देऊन बिहारच्या जनतेला आव्हान केले.
बिहारच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्वोच्च सर्वाधिक 66.91 टक्के मतदान झाले. यापूर्वी 2020 च्या विधानसभा निवडणुकीत 60 टक्केपेक्षा अधिक आणि 1998 च्या लोकसभा निवडणुकीत 64 टक्के मतदान झाले होते. मागील निवडणुकीत पुरुषांचे मतदान 70 टक्के आणि महिलांचे मतदान 53 टक्के झाले होते. यावेळी महिलांच्या मतांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली आणि पुरुषांच्या मतांमध्ये आठ टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे महिलांच्या मतांवरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले.