

शिमला : हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीत 56 वर्षांनंतर चार भारतीय जवानांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. डोगरा स्काऊटस् (लष्कर) आणि तिरंगा पर्वतीय बचाव पथकांच्या संयुक्त मोहिमेअंती हे अवशेष बाहेर काढण्यात आले. 7 फेब्रुवारी 1968 मध्ये भारतीय हवाईदलाचे एएन-12 विमान दिब्रुगडहून लेहला जात असताना रोहतांग खिंडीत कोसळले होते. 102 सैनिक त्यात होते.
2019 पर्यंत सापडले 5 मृतदेह 2003 मध्ये या विमानाचे अवशेष सापडल्यानंतर भारतीय सैन्याने, विशेषत: डोगरा स्काऊटस्ने 2005, 2006, 2013 आणि 2019 मध्ये शोधमोहिमा राबवल्या. हा भूभाग जटिल असल्यामुळे 2019 पर्यंत फक्त पाच मृतदेह सापडले होते. सप्टेंबर 2024 मधील मोहिमेत हे 4 मृतदेह सापडले.
मलखान सिंग, कॉन्स्टेबल नारायण सिंग आणि थॉमस चरण यांचे हे मृतदेह आहेत.
चौथ्या मृतदेहाच्या अवशेषांची अद्याप ओळख पटलेली नाही.