मुलांच्या ६ कफ सिरपमध्ये घातक रसायन; ‘सीडीएससीओ’च्या तपासण्यांचा निष्कर्ष

Cough Syrup
Cough Syrup

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जीवघेणी ठरू शकतील, अशा औषधींची विक्री म्हणजे मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण असते. गाम्बियासह विविध आफ्रिकन देशांत औषधांमुळे झालेल्या मृत्यूनंतर भारतातही सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून (सीडीएससीओ) ऑगस्ट 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्याचे निष्कर्ष समोर आले असून 10 औषधींच्या तपासणीअंती त्यात डाय-इथाइलिन ग्लायकोल (डीईजी) व इथाइलिन ग्लायकोल (ईजी) ही रसायने जीवघेण्या प्रमाणात आढळून आली आहेत.

तपासणीला घेतलेल्या 10 औषधींपैकी सहा औषधे ही लहान मुलांना खोकल्याच्या त्रासावर देण्यात येतात. विशेषत: या एका कारणामुळे सीडीएससीओच्या हे निष्कर्ष धक्कादायक ठरलेले असून त्यामुळे देशभरातच खळबळ उडाली आहे.

गाम्बिया, कॅमेरुनसह विविध आफ्रिकन देशांत तसेच उझबेकिस्तानात मिळून गेल्या एक ते दोन वर्षांत 140 वर मुलांचा मृत्यू कफ सिरपमुळे ओढवल्याचे समोर आले होते. या मृत्यूंना सिरपमधील रसायनांचे प्रमाण कारणीभूत ठरले होते. हे सगळे कफ सिरप भारतात तयार झालेले होते. या पार्श्वभूमीवर जून 2023 पासून सीडीएससीओने निर्यात करावयाच्या सर्व कफ सिरपची प्रयोगशाळेत तपासणी अनिवार्य केली होती. याअंतर्गत जून ते ऑक्टोबर 23 दरम्यान 54 फार्मा कंपन्यांचे नमुने फेल ठरले आहेत.

खोकल्यावरील ही 6 औषधे फेल

कोफवोन एलएस, ग्वायफेनेसीन सिरप-100, ग्वायफेनेसीन, सिलप्रो प्लस, कोल्ड आऊटच्या दोन बॅच.

घातक रसायनांचे प्रमाण

कफ सिरप ट्रिमॅक्स एक्सपेक्टोरंटमध्ये 0.118 टक्के ईजी होते. कोल्ड आऊटमध्ये 1.9 ईजी व 0.14 टक्के डीईजी होते. हृदयरोगासाठीच्या डिझिव्हर इंजेक्शनमध्ये ईजी व डीईजी मोठ्या प्रमाणात आढळले. लर्जी औषधी सिलप्रो प्लस सिरपमध्ये 0.171 टक्के ईजी व 0.243 टक्के डीईजी आढळले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार ईजी किंवा डीईजीचे प्रमाण 0.10 टक्क्यांहून जास्त असता कामा नये.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news