Cylinder Explosion : छतावर ठेवलेल्या सिलिंडरचा उष्णतेमुळे स्फोट?, 100 मिटरपर्यंत उडाले तुकडे...

या भीषण स्फोटामुळे घराच्या भिंतींनाही तडे गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
छतावर ठेवलेल्या सिलिंडरचा उष्णतेमुळे स्फोट?, 100 मिटरपर्यंत उडाले तुकडे...
छतावर ठेवलेल्या सिलिंडरचा उष्णतेमुळे स्फोट?, 100 मिटरपर्यंत उडाले तुकडे...file photo
Published on
Updated on

Cylinder Kept on Roof Explodes Due to Heat? Fragments Blown Up to 100 Meters

पुढारी ऑनलाईन :

मुरादाबादमध्ये प्रचंड उष्णतेमुळे घराच्या तिसऱ्या मजल्यावरील छतावर ठेवलेला गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. सिलिंडरचे तुकडे तब्बल 100 मीटर दूर जाऊन पडले. आसपासच्या अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले. मोठा आवाज आणि धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

छतावर ठेवलेल्या सिलिंडरचा उष्णतेमुळे स्फोट?, 100 मिटरपर्यंत उडाले तुकडे...
Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय बालकाचा मृत्यू

मुरादाबाद शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या लालबाग परिसरात शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. घराच्या तिसऱ्या मजल्यावरील छतावर ठेवलेला गॅस सिलिंडर उष्णतेमुळे फुटला. त्या वेळी तापमान 40 अंशांच्या पुढे होते आणि जवळच लावलेल्या एसीच्या आउटडोअर युनिटमधून निघणारी उष्णता सिलिंडरला सहन झाली नाही. त्‍यातून स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या स्फोटाने सिलिंडरचे तुकडे 100 मीटर दूरपर्यंत उडाले. अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले. जोरदार स्फोट आणि धुरामुळे नागरिक घाबरून गेले.

मुगलपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालबाग कहारों वाले मंदिराजवळील गल्लीत मोहम्मद इमरान यांचे तीन मजली घर आहे. ते डिश केबलचे काम करतात. शुक्रवारी रात्री त्यांच्या घरी पाहुणे आले होते. उकाडा असल्यामुळे छतावर स्वयंपाक करण्यात आला होता.

छतावर ठेवलेल्या सिलिंडरचा उष्णतेमुळे स्फोट?, 100 मिटरपर्यंत उडाले तुकडे...
Heatwave tourism impact : तापमानवाढीने पर्यटनावर परिणाम; बीबी का मकबऱ्यावरही पर्यटकांचा ओघ घटला

जेवण झाल्यानंतर पाहुणे निघून गेले आणि कुटुंबीयांनी गॅस सिलिंडर व इतर सामान छतावरच ठेवले. ज्या ठिकाणी सिलिंडर ठेवला होता, त्याच्याजवळ एसीची आउटडोअर युनिट बसवलेली होता.

100 मीटर दूरपर्यंत उडाले तुकडे

मोहम्मद इमरान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी दुपारी सुमारे 1 वाजता तीव्र उष्णता आणि एसी युनिटमधून येणाऱ्या उष्णतेमुळे सिलिंडर मोठ्या आवाज करून फुटला. सिलिंडरचे तुकडे भिंत फोडून इतर घरांच्या छतांवर जाऊन पडले. जवळपास 100 मीटर दूरपर्यंत तुकडे उडाले आणि विटाही हवेत उडाल्या.

सिलिंडरच्या तुकड्यामुळे शेजारी दीपक दिवाकर यांच्या घरावरील पाण्याची टाकी फुटली. दुसरे शेजारी कलुआ यांच्या घराच्या छतावरही तुकडे पडले. गौरव दिवाकर आणि ऋतिक यांच्या घरांच्या भिंतींना तडे गेले.

सुदैवाने त्या वेळी प्रचंड उष्णतेमुळे छतांवर किंवा गल्लीमध्ये कोणीही नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मोठा आवाज ऐकून लोक घराबाहेर आले आणि दृश्य पाहून हादरले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. मुख्य अग्निशमन अधिकारी राजीव कुमार पांडेय यांनी सांगितले की, गॅस सिलिंडर छतावर ठेवलेला होता आणि त्याच्या शेजारी एसीची आउटडोअर युनिट होती. उन्हाची तीव्रता आणि युनिटमधून निघणाऱ्या उष्णतेमुळे सिलिंडर फुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

काही वेळ लोकांना समजलंच नाही काय घडलं

छतावरील सिलिंडर अचानक फुटल्यानंतर काही काळ लोकांना नेमके काय घडले हेच समजले नाही. लालबागमधील रहिवासी गौरव, दीपक, राजेश आणि मोहम्मद फुरकान यांनी सांगितले की, उष्णतेमुळे बहुतांश लोक घरात होते. दुपारी अचानक मोठा आवाज झाला. स्फोट छतावर झाल्यामुळे सुरुवातीला काहीच समजले नाही. नंतर छतांवर विटा आणि सिलिंडरचे तुकडे विखुरलेले दिसले.

स्फोटानंतर गुप्तचर विभागही सतर्क

मुगलपुरा परिसरातील घराच्या छतावर स्फोट झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध अफवा पसरू लागल्या. त्यामुळे पोलीस आणि गुप्तचर विभाग सतर्क झाला. पोलीस आणि एलआययूच्या पथकाने घटनास्थळी जाऊन चौकशी केली आणि नागरिकांचे जबाब नोंदवले. त्यानंतर हा सिलिंडर स्फोट असल्याचे स्पष्ट झाले.

उन्हाळ्यात घ्या ही काळजी

मुख्य अग्निशमन अधिकारी डॉ. राजीव कुमार पांडेय यांनी सांगितले की, एलपीजी सिलिंडर नेहमी थंड, हवेशीर आणि सावलीच्या ठिकाणी सरळ उभा ठेवावा. सिलिंडरला उन्हात किंवा उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांजवळ ठेवू नये. जर रात्री छतावर किंवा मोकळ्या जागेत गॅस सिलिंडरचा वापर केला असेल, तर सकाळी ऊन पडण्यापूर्वी तो तेथून हटवावा. जास्त उष्णतेमुळे सिलिंडरचा स्फोट होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news