Crocodile : मगर पकडली, खांद्यावर घेतली अन् वाहनाच्या छतावरही बसवली; बिहारमधील (VIDEO) चर्चेत

मगर पाहून भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते, पण येथे लोकांनी चक्क खांद्यावर घेतली अन्
Crocodile
Crocodile : मगर पकडली, खांद्यावर घेतली अन् वाहनाच्या छतावरही बसवली; बिहारमधील VIDEO चर्चेतfile photo
Published on
Updated on

crocodile was found in rice field in bihar local people rescue it and handed over to forest department

पुढारी ऑनलाईन : बिहारमधील भाताच्या शेतात मगर आढळली: मगर पाहिल्यावर अनेकांची भीतीने गाळण उडते. मात्र बिहारमधील काही स्थानिकांनी चक्क मगर पकडून ती खांद्यावर उचलली आणि वन विभागाच्या ताब्यात दिली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मगरीचा आकार आणि तिचे रूप पाहून अनेकांना भीती वाटते. तिच्या जवळ जाण्याचीही लोक हिंमत करत नाहीत. मात्र बिहारमधील या घटनेत स्थानिकांनी धाडस करत मगर पकडली. विशेष म्हणजे, तिला पकडण्याची पद्धतही चर्चेचा विषय ठरली आहे. ही मगर भाताच्या शेतात आढळल्याचे सांगितले जात आहे.

Crocodile
Ramayana : कागदावर पेंटिंग, मग दागिने तयार! रामानंद सागर यांनी ‘रामायण’मधील राम-सीतेचा लूक असा केला होता खास

हा व्हिडिओ अंजली कुमारी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मगर पाहून लोक पळून जातात; मात्र बिहारमध्ये काही लोक तिलाच चक्क रस्त्यावर घेऊन जाताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या खांद्यावर मगर दिसत आहे. तिच्या तोंडाला बांधण्यात आले आहे, जेणेकरून ती कोणाला इजा करू नये. त्यानंतर हीच मगर एका वाहनाच्या छतावरही दिसते. काही लोक तिला पकडून ठेवताना दिसत आहेत.

स्थानिक ग्रामस्थांनी या मगरीला वन विभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर वन विभागाने मगरीला कोसी नदीत सोडल्याचे सांगितले जात आहे.

Crocodile
The Glass House : ना भिंती, ना खिडक्या! जंगलाच्या कुशीत अभय देओलचं काचेचं घर, VIDEO पाहून व्हाल थक्क!

कारनामेच वेगळ्या लेव्हलचे!

हा व्हिडिओ मगरीचा असला तरी सोशल मीडियावर चर्चेत आहेत ते स्थानिकांचे धाडस. व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “बिहारमधील कारनामेच वेगळ्या लेव्हलचे असतात.” तर दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले, “हे बिहार आहे, इथे जे कोणी विचारही करू शकत नाही, ते सगळं घडतं.”

स्थानिकांनी मगरीला पकडले

भाताच्या शेतात मगर आढळल्यानंतर स्थानिकांनी तिला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर मगरीला सुरक्षितपणे कोसी नदीत सोडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news