

दाम्पत्याने गेल्या ५-६ महिन्यांपासून थकवले होते भाडे
'मेड'ला संशय आल्याने भयंकर गुन्ह्याचा पर्दाफाश
भाड्याच्या वादातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट
shocking crime news
गाझियाबाद: घरभाडे मागणे घरमालकिणीच्या जीवावर बेतल्याची भयंकर घटना गाझियाबादमध्ये उघडकीस आली आहे. गेल्या ५-६ महिन्यांपासून घरभाडे थकित ठेवलेल्या भाडेकरू दाम्पत्याने घरमालकिणीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरले आणि बेडमध्ये लपवून ठेवले होते. अखेर हा माणसकीला काळिमा फासणारा गुन्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने उलगडा.
गाझियाबाद येथील राजनगर एक्सटेंशनमधील 'ऑरा चिमेरा' दीपशिखा शर्मा यांचा फ्लॅट होता. हा फ्लॅट दाम्पत्याला भाड्याने दिला होता. बुधवार, १७ डिसेंबर रोजी दीपशिखा भाडे घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या घरी परत आल्या नाहती. कुटुंबीयांनी त्यांची शोधशोध सुरू केली. सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दीपशिखा शर्मा संध्याकाळच्या वेळी भाडेकरूंच्या फ्लॅटकडे जाताना दिसल्या, परंतु त्या बाहेर येताना दिसल्या नाहीत. संशय बळावल्याने सोसायटीतील नागरिक आणि नातेवाईक संबंधित फ्लॅटवर पोहोचले. यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास नंदग्राम पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती मिळाली. दीपशिखा शर्मा बराच वेळ परतल्या नाहीत, तेव्हा त्यांच्याकडे काम करणाऱ्या 'मेड'ला संशय आला आणि ती त्या फ्लॅटवर पोहोचली. तिथल्या संशयास्पद हालचाली पाहून घराची झडती घेतली असता, एका लाल रंगाच्या बॅगेत दीपशिखा यांचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला.
याप्रकरणी पोलिसांनी अजय गुप्ता आणि आकृती गुप्ता या भाडेकरू दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात भाड्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.