Crime News :
केरळमधील पथनामथिट्टा जिल्ह्यात एक भयानक क्राईम घडला. एका कपलला दोन पुरूषांचा भयानक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या जोडप्यानं या दोन पुरूषांना घरी बोलवून त्यांचा अत्यंत क्रूर पद्धतीनं छळ केला. विशेष म्हणजे या छळात जिच्याशी या दोघांचेही संबंध होते त्या पत्नीनं देखील सहभाग घेतलाय.... यानंतर आता पोलिसांनी या जोडप्यावर गुन्हा दाखल केलाय.
त्याचं झालं अस.... कोईपुरम या गावात मलयील वेट्टी जयेश हा ३० वर्षाचा व्यक्ती त्याची पत्नी रश्मी (वय २५) एकत्र रहात होते. या जोडप्यानं एका १९ वर्षाच्या आणि एका २९ वर्षाच्या दोन पुरूषांना वेगवेगळ्या दिवशी आपल्या घरी आमंत्रित केलं. यानंतर या दोघांनी त्यांचा क्रूर छळ केला. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत कसं पोहचलं याची देखील एक वेगळीच स्टोरी आहे.
२९ वर्षाचा हा पीडित पुरूष गेल्या आठवड्यात पोलीस स्टेशन मध्ये गेला अन् त्यानं त्याच्या गर्लफ्रेंड आणि त्याच्या कुटुंबियांनी छळ केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना त्यानं दिलेल्या माहितीत विसंगती आढळून आली. पोलीस खोलात शिरल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला, पोलिसांना देखील धक्का बसला.
पीडित पुरूषानं यामागं जयेश आणि रश्मी हे कपल असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे जयेश हा २९ वर्षाच्या पीडित पुरूषांचा सहकारी असून ते बंगळुरू इथं एकत्र काम करत होते. दरम्यान, पोलिसांनी अधिक तपास केल्यावर या सायको कपलनं अजून एका १९ वर्षाच्या पुरूषाचा अमानुष छळ केल्याचं समोर आलं. या कपल्सनी या दोघांचा छळ हा बदला घेण्यासाठी केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मीचे या दोन्ही पीडितांसोबत संबंध निर्माण झाले होते. त्यातच याबाबतचे चॅट्स जयेशच्या हाती लागले. त्यानंतर जयेशनं या दोघांचा बदला घेण्यासाठी एक कट रचला. त्यात रश्मीनं देखील पतीसोबत या कटात सामील झाली.
२९ वर्षाच्या पीडित पुरूषाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्यानं त्याला ५ सप्टेंबर रोजी ओनम सण साजरा करण्यासाठी घरी बोलवलं. ज्यावेळी तो या जोडप्याच्या घरी गेला त्यावेळी त्यांनी त्याच्या डोळ्यात पेपर स्पे मारला. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, पीडित पुरूष म्हणाला, 'या जोडप्यानं माझे हात बांधले आणि मला लाकडी खांबाला लटवलं. त्यानंतर रश्मीनं माझ्यावर अनेक गोष्टींनी हल्ला केला. त्यात लोखंडी रॉडचा देखील वापर करण्यात आला.'
पीडित पुढे म्हणाला, 'ज्यावेळी रश्मी माझा छळ करत होती त्यावेळी जयेश त्याचं मोबाईलवर रेकॉर्डिंग करत होता. माझे प्रायव्हेट पार्ट्स अनेकवेळा स्टेपल करण्यात आले.' पीडितेनं सांगिलं की त्याचा छळ करून झाल्यावर या जोडप्यानं मला पुथूमोन इथं टाकून दिलं.
दरम्यान, ज्यावेळी पोलिसांनी या सायको कपलला अटक केली त्यावेळी पोलिसांना अजून एका गुन्ह्याची माहिती समजली. या जोडप्यानं १ सप्टेंबर रोजी देखील असाच एका पुरूषाचा छळ केला होता. पोलिसांनी या १९ वर्षाच्या पीडित पुरूषाकडं चौकशी केली असता त्यानं आपल्या सोबत काय घडलं हे सांगितलं.
जयेशनं या पीडित पुरूषाला मारमोन भागातून दूचाकीवरून घेऊन आला. त्यानंतर या पुरूषाला विवस्त्र करून त्याचा छळ करण्यात आला, त्याचे हात शॉलनं बांधण्यात आले. या पीडित पुरूषाला देखील लाकडी खांबाला लटकवण्यात आलं होतं. जयेश मोबाईलवर शूटिंग करत होता. त्याला बेदम मारहाण करत होता. त्यानंतर पक्कडीनं त्याचा छळ करण्यात आला. एवढंच नाही तर या जोडप्यानं त्याचे २० हजार रूपये लुटले. त्यानंतर १००० रूपये देऊन त्याला रिक्षा स्टँडवर सोडण्यात आलं.
पोलिसांनी या जयेशची खोलात जाऊन चौकशी केली असता या जयेशवर काही वर्षापूर्वी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्याला यासाठी तुरूंगवास देखील भोगावा लागला होता. त्यानंतर त्यानं रश्मीसोबत लग्न केलं. या जोडप्याला दोन मुलं देखील आहेत.