कोरोना रूग्‍णसंख्येत गेल्‍या २४ तासात ४ हजारांनी वाढ; सक्रीय रूग्‍णसंख्या ४३ हजारांवर

कोरोना रूग्‍णसंख्या
कोरोना रूग्‍णसंख्या

नवी दिल्‍ली; पुढारी वृत्तसेवा सरत्या चोवीस तासात कोरोना रुग्ण संख्येत 4 हजार 777 ने वाढ झाली आहे. या कालावधीत 24 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून आज (रविवार) देण्यात आली. सक्रीय रुग्णांची संख्या आता 43 हजार 994 वर पोहोचली आहे.

सक्रीय रुग्ण संख्येचा विचार केला तर भारत सध्या जगात पाचव्या क्रमांकावर आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 45 लाख 68 हजार 114 लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. मृतांचा एकूण आकडा देखील वाढून 5 लाख 28 हजार 510 वर पोहोचला आहे. मृत्यू दर 1.19 टक्के इतका नोंदवला गेला आहे. दरम्यान कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत 217 कोटी 56 लाख 67 हजार 942 डोसेस देण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4 कोटी 39 लाख 95 हजार 610 वर पोहोचली असून, रिकव्हरी दर 98.72 टक्के इतका आहे. सरत्या चोवीस तासात कोरोनातून 5 हजार 196 लोक बरे झाले आहेत. गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्ण संख्येत 33 हजार 926 ने वाढ झालेली आहे.

कोरोनामुळे प्रभावित झालेल्या राज्यात महाराष्ट्र आघाडीवर असून, त्याखालोखाल केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे. सध्याच्या सक्रीय रूग्ण संख्येचा विचार केला तर केरळ 14 हजार 276 रुग्णांसह आघाडीवर आहे. त्याखालोखाल तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि प. बंगाल यांचा समावेश आहे. एकूण मृतांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असून त्याखालोखाल केरळ, कर्नाटक, तामिळनाडू व दिल्ली यांचा क्रमांक लागतो.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news