विनेश 'जुलाना'मधून काँग्रेसच्या उमेदवार, बजरंग पुनिया उमेदवारांच्या यादीत नाही

Haryana elections : काँग्रेसकडून उमेदवारांची पाहिली यादी जाहीर
Haryana elections, Congress, Vinesh Phogat, Bajrang Punia
विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.(Photo- PTI)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) आता राजकीय दंगल खेळणार आहे. तिने शुक्रवारी काँग्रेस (Congress) पक्षात जाहीर प्रवेश केला. विनेश फोगाटला हरियाणा विधानसभेच्या (Haryana elections) जुलाना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने शुक्रवारी हरियाणातील आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यातून जुलानामधून विनेशच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.

विनेश फोगाट आणि टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया (Tokyo Olympics bronze medallist Bajrang Punia) यांनी शुक्रवारी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर लगेच काही तासांतच काँग्रेसने हरियाणातील ९० पैकी ३१ जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर लगेचच काँग्रेसने इसराना जागेसाठी बलबीर सिंग यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामुळे काँग्रसने आत्तापर्यंत ३२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

काँग्रसेने माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते भूपिंदर सिंह हुडा यांना गढी सांपला-किलोली मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे, तर कर्नालच्या माजी महापौर आणि सधौरा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार रेणू बाला यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.

बजरंग पुनिया निवडणूक लढवणार नाही

आज तकच्या वृत्तानुसार, बजरंग पुनिया निवडणूक लढवणार नाही. बजरंग बादली येथून निवडणूक लढवतील, अशी चर्चा आधी राजकीय वर्तुळात होती. कारण बजरंग हे बादली येथील आहेत. पण आता स्पष्ट झाले आहे की, ते निवडणूक लढवणार नाहीत. ते केवळ निवडणुकीत प्रचार करतील.

दरम्यान, काँग्रेसने बजरंग पुनियाची अखिल भारतीय किसान काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मंजुरीनंतर बजरंग यांची निवड केली असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

मी एक नवीन प्रवास सुरू करतेय- विनेश फोगाट

काँग्रेस प्रवेशानंतर विनेश फोगाट म्हणाली, ''भाजप ब्रिजभूषण शरण सिंह यांना पाठीशी घालत होती. तर जेव्हा कुस्तीपटूंना दिल्लीत रस्त्यावरून ओढून नेले जात होते; तेव्हा काँग्रेसने आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला होता. मी देशातील जनता आणि मीडियाचे खूप आभार मानते. माझ्या कुस्तीच्या प्रवासात तुम्ही मला साथ दिली. मी विशेष म्हणजे काँग्रेसचे आभार मानते. कठीण काळ तुम्हाला सांगतो की तुमच्यासोबत कोण आहे. आम्हाला जेव्हा रस्त्यावरून फरफरटत नेले; तेव्हा भाजप वगळता सर्व पक्ष आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मी एक नवीन प्रवास सुरू करत आहे, मला वाटते की आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो; ते खेळाडूंना सहन करावे लागणार नाही. आम्ही कदापि घाबरणार नाही आणि मागे तर हटणार नाही. न्यायालयीन लढाई सुरु आहे. आम्ही तीही जिंकू'', असा ठाम विश्वास विनेशने व्यक्त केला.

Haryana elections, Congress, Vinesh Phogat, Bajrang Punia
Vinesh Phogat join Congress | कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news