Tamil Nadu cabinet expansion |तामिळनाडूत तब्‍बल ५९ वर्षानंतर काँग्रेस सरकारमध्ये

सरकारमध्ये काँग्रेसचे २ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार
Tamil Nadu cabinet expansion
विजय यांच्‍या मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शपथविधी सोहळ्यास काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्‍थित होते. Pudhari
Published on
Updated on

Tamil Nadu cabinet expansion

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तमिळनाडू सरकारमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने २ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यानिमित्त ५९ वर्षांच्यानंतर काँग्रेस राज्य सरकारमध्ये सहभागी होणार आहे.

तामिळनाडूत काँग्रेसची टीव्‍हीकेबरोबर युती

काँग्रेस आमदार राजेश कुमार आणि पी. विश्वनाथन गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या दोन्ही आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तमिळनाडूमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीके सोबत काँग्रेसचा सहभाग हा नव्या आघाडीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

Tamil Nadu cabinet expansion
Tamil Nadu Vijay CM oath ceremony: तामिळनाडूत 'विजय' पर्वाला प्रारंभ; सी. जोसेफ विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

काँग्रेसला कोणती खाती मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

सध्या तामिळनाडू विधानसभेत काँग्रेसचे ५ आमदार निवडून आलेले आहेत. सत्ताधारी आघाडीत काँग्रेसचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या मंत्रिपद विस्ताराकडे महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, या शपथविधीनंतर मंत्रिमंडळातील खात्यांचे वाटप आणि काँग्रेसला कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Tamil Nadu cabinet expansion
Vijay won the floor test: सभागृहात विजय यांचे 'वाढीव' बहूमत... समर्थनाचा आकडा पोहचला १४४ वर, अण्णा द्रमुकची मते फुटली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news