नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: हरियाणामधील काँग्रेसच्या आमदार किरण चौधरी आणि त्यांच्या कन्या माजी खासदार श्रुती चौधरी यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पक्षप्रवेश झाल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दिल्लीस्थित भाजप मुख्यालयात हरियाणाचे मुख्यमंत्री नायाबसिंह सैनी, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चूघ यांच्या उपस्थितीत किरण चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. किरण चौधरी यांनी त्यानंतर आपल्या मुलीसह भाजप अध्यक्ष जे पी. नड्डा यांची भेट घेतली.
किरण चौधरी या हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल चौधरी यांच्या स्नुषा आहेत. त्या हरियाणाच्या तोशाम विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिल्या आहेत. गेली ४० वर्षे त्या काँग्रेसमध्ये होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांची कन्या श्रुती चौधरी यांना काॅंग्रेसने उमेदवारी दिली नसल्याने त्या नाराज होत्या.
हेही वाचा