ब्रेकिंग: काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांना नियमित जामीन मंजूर

काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम. 
( संग्रहित छायाचित्र )
काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम. ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांना नियमित जामीन मंजूर केला असल्‍याचे वृत्त ANI ने दिले आहे.

काय आहे प्रकरण ?

२०११ मध्‍ये काही चिनी नागरिकांना व्‍हिसादेण्‍यासाठी ५० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाशी संबंधित एका कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी त्‍यांना अटक झाली होती.

कथित चीनी व्हिसा घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने ५ एप्रिल २०२४ रोजी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला होता. ईडीने नियमित जामीन अर्जांवर उत्तरे दाखल करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर न्‍यायालयाने त्‍यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता.

लाेकसभा निवडणुकीत कार्ती चिदंबरम विजयी

नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत कार्ती चिदंबरम यांनी शिवगंगाई लोकसभा मतदारसंघातून 2,05,664 मतांनी विजयी झाले आहेत. शिवगंगाई लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवार रिंगणात होते, मात्र भाजप, काँग्रेस आणि अण्णाद्रमुक यांच्यात तिरंगी लढत झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news