ऑक्टोबर सुरु होताच महागाईचा झटका! LPG सिलिंडर दरात वाढ

LPG Price Hike | एलपीजी सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी महागला
LPG Price Hike
व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑक्टोबर सुरु होताच दसरा आणि दिवाळी सणाच्या आधी लोकांना महागाईचा झटका बसला आहे. तेल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Price Hike) दरात वाढ केली आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ४८.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर ५ किलो फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरही १२ रुपयांनी महागला आहे. या वाढीव किमती आज १ ऑक्टोबरपासून लागू झाल्या आहेत.

दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या १४ किलोच्या घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत ८०३ रुपये आहे.

सप्टेंबर महिन्यात व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात सुमारे ३९ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या (19 kg cylinder rates) दरात तिसऱ्यांदा वाढ केली आहे. गेल्या ३ महिन्यांत व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किंमतीत एकूण ९४ रुपयांची वाढ केली आहे.

LPG cylinder prices : मुंबईत किती रुपयांना मिळणार सिलिंडर?

सप्टेंबर महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात सुमारे ३९ रुपयांची वाढ करण्यात आली होती. १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता दिल्लीत १,७४० रुपये झाली आहे. जी याआधी १,६९१.५० रुपये होती. कोलकातामध्ये १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १,८५०.५० रुपये आहे; तर मुंबईत १,६९२.५० रुपये आहे.

LPG Price Hike
‘पीएफ’ मधून आता अधिक पैसे काढा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news