Coldrif Cough Syrup Row : विषारी कफ सिरप प्रकरणी स्रेसन फार्मासिटीकल्सच्या मालकाला अटक

Coldrif Cough syrup
कोल्ड्रिफ कफ सीरपची सर्रास ऑनलाइन विक्री
Published on
Updated on

Coldrif Cough Syrup Row :

विषारी Coldrif cough syrup पिल्यानं मध्य प्रदेशातील २१ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मध्य प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली असून चेन्नईमधुन स्रेसन फार्मासिटिकल्सचे मालक जी रंगनाथन यांना अटक करण्यात आली आहे.

७३ वर्षाचे रंगनाथन हे मद्रास मेडिकल कॉलेजमधून पासआऊट झालेले आहेत. त्यांनी चार दशापासून ते औषध निर्मितीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सुरूवातीला प्रोनीट हे पोषण देणारं सिरप तयार केलं होतं. तिथून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

Coldrif Cough syrup
Children’s Cold and cough medicine: लहान मुलांच्या सर्दी, खोकल्याच्या औषध वापरासंबंधी केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

१९८० च्या दशकात रंगनाथन यांनी स्वतः या प्रोनीटचं प्रमोशन बालरोगतज्ञांकडे जाऊन केलं होत. या सिरपचा फायदा गर्भवती महिलांना होतो असा दावा देखील त्यांनी केला होता. या उत्पादनानं चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. मात्र नंतर राज्य सरकारच्या ड्रग्स आणि कंट्रोल विभागानं याच्या उत्पादनासाठी सरकारची परवानगी लागते असं सांगितलं. तसंच यातील काही घटकांसाठी लायसन्स देखील गरजेचं असतं याकडं लक्ष वेधलं होतं.

यानंतर रंगनाथन यांनी सरकारच्या परवानग्या मिळवल्या आणि आपला व्यवसाय सुरू ठेवला. त्यांनी त्यानंतर लिक्वीट नेसल प्रोडक्टमध्ये देखील आपल्या कंपनीचा विस्तार केला. त्यांनी चेन्नईत छोटी छोटी मॅन्युफेक्चरिंग युनिट देखील स्थापन केली.

कालांतरानं ते स्रिसेन फार्मासिटिकल्सचे प्रमुख बनले. त्यांनी Ceego Labs शी टायअप देखील केलं. त्याचबरोबर त्यांची असोसिएट कंपनी आवेन हेल्थकेअरचं व्यवस्थापन देखील पाहते. विशेष म्हणजे रंगनाथन यांची फार्मा इंडस्ट्रीजमध्ये युवा उद्योजकांना प्रोत्साहन देणारे व्यक्ती अशी ओळख आहे.

मात्र नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर त्यांच्या प्रतिमेला तडे गेले आहेत. चेन्नई-बंगळुरू हायवेवरील त्यांचे २ हजार स्क्वेअर फूटमधील मॅन्युफॅक्चरिंग युनिट सील करण्यात आलं आहे. त्यांचे कोडमबक्कम येथील कार्यालयाला देखील टाळं लावण्यात आलं आहे.

Coldrif Cough syrup
Coldrif Cough syrup: कोल्ड्रिफ कफ सीरपची सर्रास ऑनलाइन विक्री

शेजाऱ्यांनी सांगितलं की या ऑफिमध्ये कधीकाळी येणाऱ्या जाणाऱ्यांची रेलचेल असायची. आता गेल्या आठवड्यापासून इथं सगळं शांत आहे. गेल्या रात्रीच कर्मचाऱ्यांनी सर्व कॉम्पुटर आणि उपकरणं हालवली होती.

दरम्यान, तमिळनाडूमधील लॅबमध्ये कोल्ड्रीफ कफ सिरपची चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी या सिरपमध्ये हानीकारक सबस्टन्स असल्याचं आढळून आलं होत. मध्य प्रदेश सरकारनं देखील याच्या वापरावर बंदी घातली आहे. त्याचबरोब स्रेसन फार्मासिटिकल्सच्या इतर वैद्यकीय उत्पादनांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news