

पुढारी ऑनलाईन डेस्क: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज (दि.७) सर्वोच्च न्यायालयात AI वकीलाशी संवाद साधला. यावेळी चंद्रचूड यांनी प्रश्न देखील विचारले. याचा व्हिडिओ 'PTI' ने शेअर केला आहे.
भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी गुरुवारी (दि.७) भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील राष्ट्रीय न्यायिक संग्रहालय आणि अभिलेखागार (NJMA) मध्ये एका 'AI वकीला'शी संवाद साधला. त्यांनी भारतात मृत्युदंडाची शिक्षा घटनात्मक आहे का? असा प्रश्न एआय वकिलाला (AI lawyer) विचारला.
भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा उद्या सरन्यायाधीश म्हणून कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून जुन्या न्यायाधीशांच्या ग्रंथालयाचे सार्वजनिक संग्रहालयात रूपांतर करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे.