

पुढारी ऑनलाईन डेस्क : Chhattisgarh Naxalites Surrender | छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ५२ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ९ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. हिडमा आणि देवाच्या टीममधील कट्टर नक्षलवादी दाम्पत्यानेही त्यामध्ये आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी ६ महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी ८ लाख रुपये, दोन महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १ लाख रुपये आणि एका नक्षलवाद्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई सुरू आहे. अनेक मोठे नक्षलवादी चकमकीत मारले जात आहेत. अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नक्षलवाद्यांवर कारवाई होत असताना, आता मोठे नक्षलवादीही नक्षलवाद सोडून मुख्य प्रवाहात परतत आहेत. गुरुवारी ९ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामध्ये नक्षलवादी हिडमा आणि देवाचे सहकारी आहेत, ज्यांच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पीएलजीए बटालियन क्रमांक एकचे आहेत.