

पुढारी ऑनलाईन डेस्क: छत्तीसगडमधील नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (दि.४) मोठी चकमक सुरू आहे. यामध्ये पूर्वी ७ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान चकमक सुरूच असून एकूण १४ दहशतवाद्यांचा पोलीस दलाकडून खात्मा करण्यात असल्याचे वृत्त एएनआयन दिले आहे.
नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात नारायणपूर पोलिस आणि दंतेवाडा पोलिसांच्या संयुक्त दलात आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिस दलाला यश आले आहे. यानंतर ते क्षेत्र सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी आणि उर्वरित नक्षलवाद्यांच्या उपस्थितीबद्दल आणखी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी ऑपरेशन सुरू ठेवत असल्याचे देखील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
एका अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, छत्तीसगड आणि पोलीस दलात झालेल्या कारवाईत सर्व सात बंडखोर नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून, त्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.