

पुढारी ऑनलाईन डेस्क : Naxalites Encounter | छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम येथे शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यानंतर नक्षलवादी आणि सैनिकांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून त्यांच्याकडील शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.