Lok Sabha election result : राजकारणाच्‍या ‘नादा’नं बाेट गमावलं! भाजप समर्थकाने मंदिरात ताेडले स्‍वत:चे बोट!

छत्तीसगडमधील भाजप समर्थक दुर्गेश पांडे यांनी आपले बोट कापत काली मंदिरात अर्पण केले.
छत्तीसगडमधील भाजप समर्थक दुर्गेश पांडे यांनी आपले बोट कापत काली मंदिरात अर्पण केले.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणूक निकालानंतर आता देशात पुन्‍हा एकदा भाजप प्रणित एनडीए आघाडीचे सरकार स्‍थापन होणार आहे. दरम्‍यान, लोकसभा निवडणुकीत नवस बोलल्‍याप्रमाणे छत्तीसगडमधील भाजप समर्थक दुर्गेश पांडे यांनी आपले बोट कापत काली मंदिरात अर्पण केले, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे. या धक्‍कादायक घटनेनंतर दुर्गेश पांडे यांना तत्‍काळ रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले.

४ जून रोजी लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होत होते. सुरुवातीच्या मतमोजणीत भाजप विरोधी इंडिया आघाडीसह काँग्रेस आघाडीवर असल्याचे स्‍पष्‍ट झाले. यामुळे भाजप समर्थक दुर्गेश पांडे नैराश्यात गेले. त्यांनी काली मंदिरात जाऊन भाजपच्या विजयासाठी प्रार्थना केली. पांडे यांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे आणि एनडीए 272 चा बहुमताचा आकडा ओलांडताना पाहिला तेव्हा ते आनंदी झाले. ते पुन्हा काली मंदिरात गेले. येथे त्‍यांनी आपल्या डाव्या हाताचे बोट कापत ते देवीला अर्पण केले. जखमेभोवती कापड बांधून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. अति रक्तस्त्रावामुळे त्‍यांची प्रकृती खालावली. त्याच्या कुटुंबीयांनी दुर्गेश यांना समरी आरोग्य केंद्रात नेले.

बोट पुन्हा जोडता आला नाही

दुर्गेश याच्‍यावर समरी आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार झाले;पण गंभीर दुखापत असल्‍याने त्यांना अंबिकापूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्‍यात आले. येथे त्‍यांच्‍यावर ऑपरेशन करण्‍यात आले. दुर्दैवाने, उपचारास उशीर झाल्यामुळे, दुर्गेश पांडे यांच्‍या बोटाचा तोडलेला भाग पुन्हा जोडता आला नाही. पांडे यांची प्रकृती आता स्थिर आहे.

काली मंदिरात केला होता नवस

लोकसभा निवडणूक निकालाच्‍या सुरुवातील काँग्रेस आघाडीवर असल्याचे पाहून मी व्यथित झालो. काँग्रेस समर्थक खूप उत्साहित झाले. मी माझ्या गावातील काली मंदिराला गेले. हे मंदिर संपूर्ण गावाचे श्रद्धास्‍थान आहे. माझीही त्यावर श्रद्धा होती आणि नवसही केला होता, असे पांडे सांगतात. ४जून रोजी लोकसभा निवडणूक निकालात सायंकाळी भाजप निवडणूक जिंकत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. तेव्हा मी मंदिरात गेलो, माझे बोट कापले आणि अर्पण केले. भाजप आता सरकार स्थापन करेल, परंतु त्यांनी (एनडीए) 400 चा आकडा पार केला तर मला अधिक आनंद झाला असता," असेही त्‍यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले.

भाजप प्रणित एनडीएने ५४३ पैकी २९३ जागा जिंकल्‍या आहेत. तेलगू देसम पार्टीचे एन. चंद्राबाबू नायडू आणि JD(U) चे नितीश कुमार यांसारख्या मित्रपक्षांनी युतीला बहुमताचा आकडा पार करण्यास मदत केली. विरोधी इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली आहे. आता रविवारी ९ रोजी भाजप प्रणित एनडीए सरकारचा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news