Chhatrapati Shivaji Maharaj Museum : दिल्लीत दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास

New Delhi News : संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
Chhatrapati Shivaji Maharaj Museum
दिल्लीत दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास
Published on
Updated on

Chhatrapati Shivaji Maharaj Museum

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास लोकांना पाहायला मिळणार आहे. तसे खास संग्रहालय दिल्लीत साकारण्यात येत असून या संग्रहालयाचे काम लवकरच पुर्णत्वास येणार आहे. या वास्तूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दिल्लीतील छत्रपती शिवाजी मेमोरियल राष्ट्रीय समितीच्या वतीने हे संग्रहालय तयार होत आहे.

छत्रपती शिवाजी मेमोरियल राष्ट्रीय समितीच्या वतीने दिल्लीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे महासचिव सेवानिवृत्त कर्नल मोहन काक्तीकर, मिलिंद पाटील, संजय दाबके यांनी संग्रहालयासंबंधी माहिती दिली. संजय दाबके यांच्या माध्यमातून अत्याधुनिक अद्यावत असे संग्रहालय मूर्त रूपात उभे राहत आहे. छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समिती ही दिल्लीतील इन्स्टिट्यूशनल एरिया कुतुब एन्क्लेव्ह या ठिकाणी आहे. या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. दरम्यान राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जागतिक दर्जाचे संग्रहालय असावे, असा समितीचा मानस होता. त्याप्रमाणे वर्ष २०२० पासून यावर काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे संग्रहालय उभारण्यात येत असल्याचे मोहन काक्तीकर यांनी सांगितले.

Chhatrapati Shivaji Maharaj Museum
Bharat Gaurav Tourist Train | 'भारत गौरव पर्यटन रेल्वे' छत्रपती शिवाजी महाराज वारसा स्थळांचे दर्शन घडवणार

असे असणार छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय?

दिल्लीत साकारले जात असलेले हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने तयार करण्यात आलेले आहे. पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यात हे संग्रहालय असणार आहे. या संग्रहालयातील वस्तू ऐतिहासिक दस्ताऐवजांच्या सहाय्याने तयार करण्यात आल्या आहेत. संग्रहालय पाहताना जणू आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आहोत, अशा पद्धतीने ही वास्तू तयार करण्यात येत आहे. या संग्रहालयात काही भागांमध्ये १३ डी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यासह डार्क राईडच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना पाहता येणार आहेत. सबंध देशातील लक्षवेधी असे हे संग्रहालय असणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Museum
'सातारा जिल्ह्यातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर विलासपूर येथे उभारणार'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news