चांद्रयान-४ मोहिम 2027 मध्ये होणार लॉन्च

इस्रोचे वैज्ञानिक सचिव शंतनू भाटवडेकर यांची माहिती
Chandrayan-4
चांद्रयान-४ मोहिम 2027 मध्ये होणार लॉन्चPudhari File Photo
Published on
Updated on

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान मोहिम ४ साठी तयारी सुरू केली आहे. ही मोहिम पूर्ण करण्यासाठी इस्रोने २०२७ चे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, या मोहिमेसाठी केंद्र सरकारकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. तर इस्रोने केवळ चांद्रयान ४ साठीच नाही तर चांद्रयान ५ मोहिमेसाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. इस्रोचे वैज्ञानिक सचिव शंतनू भाटवडेकर यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेचा एक भाग म्हणून चांद्रयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. या ऐतिहासिक घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. त्यामुळे देशभरात राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला.

Chandrayan-4
ISRO | इस्रो चांद्रयान-४, ५ साठी सज्ज; आता सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा

दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मागील दोन महिन्यांत देशभरात एक हजाराहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. इंडियन स्पेस हॅकाथॉन आणि इस्रो रोबोटिक्स स्पर्धेतील विजेत्यांना गुरुवारी एका समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यावेळी, चांद्रयान तीन मोहिमांद्वारे संकलित केलेला वैज्ञानिक डेटा देखील जारी करेल ज्याचा उपयोग संशोधक करू शकतात. अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत पुढील वर्षी एप्रिलपर्यंत भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्याची शक्यता विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या मोहिमेसाठी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि प्रशांत बालकृष्णन नायर यांची निवड करण्यात आली आहे.

Chandrayan-4
ISRO ची आणखी एक कमाल! 'पुष्पक'चे तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग

चांद्रयान ४ मोहिमेची माहिती देताना शंतनू भाटवडेकर म्हणाले की, चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणे आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांचे नमुने गोळा करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान ४ हे नमुने परत पृथ्वीवर आणेल. जेणेकरून त्याचा अभ्यास करता येईल. यावेळी त्यांनी चांद्रयान ५ मोहिमेची माहिती दिली. ही मोहिम जपानच्या सहकार्याने पूर्ण होणार आहे. यामध्ये चंद्रावर उतरणारे अवकाशयान इस्रोचे असेल, पण चंद्रावर उतरणारे रोव्हर जपानचे असेल. ज्याचे वजन ३५० किलो असेल. या मोहिमेत ज्या भागांमध्ये सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही त्या भागांवर संशोधन केले जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news