पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या पहिल्या चंद्र मिशन चांद्रयान-१ चे मिशन संचालक आणि इस्रोचे माजी शास्त्रज्ञ श्रीनिवास हेगडे (Srinivas Hegde) यांचे शुक्रवारी बंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. तीन दशकांहून अधिक काळ (1978 ते 2014) त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सोबत काम केले होते.
श्रीनिवास हेगडे (Srinivas Hegde) यांची इस्रोसोबत प्रदीर्घ कारकीर्द होती. 1978 ते 2014 आणि UR राव सॅटेलाइट सेंटर (URSC) किंवा पूर्वीच्या इस्रो सॅटेलाइट सेंटरचा भाग म्हणून अनेक अंतराळ मोहिमांमध्ये ते सहभागी होते. हेगडे हे ISRO ने केलेल्या अनेक ऐतिहासिक मोहिमांशी संबंधित होते. त्यापैकी 2008 मध्ये चांद्रयान-1 हे प्रक्षेपित करण्यात आले. ही भारताची पहिली चंद्र मोहीम होती, ज्याने चंद्रावर पाण्याच्या रेणूंचा अभूतपूर्व शोध लावला. निवृत्तीनंतर ते बेंगळुरूस्थित स्टार्ट-अप टीम इंडसमध्ये सामील झाले होते.
हेगडे यांच्यावर किडनीच्या आजारावर उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जयनगर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा :