

Rapido 10 Lakh Penalty: सेंट्रल कंज्युमर प्रोटेक्शन अथोरिटी (CCPA) ने रॅपिडो ऑपरेट करणारी कंपनी रोप्पेन ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसला तब्बल १० लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. CCPA ने रॅपिडोवर चुकीच्या आणि दिशाफूल करणाऱ्या जाहिराती दिल्याचा, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस तसेच राईड बुकिंगवेळी डार्क पॅटर्न वापरल्याचा देखील आरोप आहे.
सीसीपीएने जर तुम्ही जास्त पैसे दिले तर तुमची राईड मिळण्याची शक्यता वाढले असे आक्षेपार्ह प्रोम्ट्स वापरण्यात आले. तसेच अॅपमध्ये सेट युवर प्राईस यासारखे फिचर देखील आहेत. अॅडव्हान टिपिंग प्रोम्ट्स देखील रॅपिडोने वापरले आहेत. सीसीपीए यांनी रॅपिडोचो इंटरफेस डिझाईन हे ग्राहकांना जास्त पैसे देण्यासाठी प्रभावित करणार आहे. सीसीपीएने रॅपिडोला जास्त पैसे दिल्यावर राईड मिळण्याची जास्त शक्यता या दाव्याला सपोर्ट करणारे पुरावे ते देऊ शकले नाहीत.
रॅपिडोने सीसीपीएला सांगितलं की टीप देणे हे औच्छिक आहे आणि आमचा मॅचिंग अल्गोरिदम हा कोणी जास्त पैसे दिले आहेत हे न पाहता ओपरेट करतो.
सीसीपीएच्या तपासणीत रॅपिडो अॅप जास्त पैसे दिल्यावर राईड मिळण्याची जास्त शक्यता असे प्रॉम्प्ट डिस्पे होतात. कॅप्टन्स ६० रूपये स्विकारात नाहीयेत. तुम्ही १०, २०, ३० रूपये देऊ शकता तुमची राईड बुकिंग अजून प्रोसेसमध्ये आहे असे प्रॉम्प्ट दिसत होते. रॅपिडो अल्गोरिदम हा आधी एक भाडं कोट करतं. त्यानंतर राईड बुकिंग झाल्यानंतर राईडसाठी जास्त पैसे देण्यासाठी प्रोम्प्ट करतात. त्यावेळी त्यांना चालक मूळ किंमत स्विकारत नाहीये असा मेसेज येतो अन् त्यांना जास्त पैसे द्यावे लागतात.