पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी सीबीएससी इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावेळी सीबीएसी मंडळाने स्पष्ट केले आहे की, "बोर्ड केवळ वैद्यकीय गोष्टी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणे आणि इतर गंभीर कारणांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना 25 टक्के सूट देते, पण त्यासाठी बोर्डाने दिलेल्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता विद्यार्थ्यांने पुर्ण केली पाहिजे".(CBSE Board Date Sheet 2025 )
अधिकृत अधिसूचनेनुसार, बोर्डाने जानेवारी २०२५ मध्ये इयत्ता १० आणि १२ वी साठी सीबीएससी बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केली आहे. सीबीएससी 10वी, 12वी बोर्ड 2025 च्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 जानेवारीपासून सुरू होतील आणि थिअरी परीक्षा पुढील वर्षी 15 फेब्रुवारीला सुरू होतील. प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन 5 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान होतील, जरी सीबीएससी हिवाळ्यातील शाळांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा 1 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. डिसेंबरमध्ये, थिअरी पेपरसाठी विषयनिहाय वेळापत्रक उपलब्ध करून द्यावे.
2025 मध्ये, देशभरातील आणि राज्यभरातील 8,000 शाळा सुमारे 44 लाख विद्यार्थी सीबीएससी बोर्डामधून इयत्ता 10 ची बोर्ड परीक्षा देतील. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी, त्यांनी 75 टक्के उपस्थिती दर राखणे आवश्यक आहे.बोर्ड परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी cbseacademic.nic.in या सीबीएससीच्या शैक्षणिक पोर्टलवर 10वी आणि 12वीचे नमुना पेपर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. नमुना पेपर्सवर जाऊन त्यांना बोर्ड परीक्षेसाठी फॉरमॅट आणि स्कोअरिंग सिस्टमची अधिक चांगली समज मिळेल. (CBSE Board Date Sheet 2025 )