महादेव बेटिंग ॲप प्रकरणी भूपेश बघेल यांना CBI चा दणका, निवासस्थानी छापेमारी

Mahadev betting app case | दिल्लीला निघण्यापूर्वीच मोठी कारवाई
Mahadev betting app case
काँग्रेसचे सरचिटणीस आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल. (file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी (Mahadev betting app case) केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी काँग्रेसचे सरचिटणीस आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. ''आता सीबीआय आली आहे. आगामी ८ आणि ९ एप्रिल रोजी अहमदाबाद (गुजरात) येथे होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC० बैठकीसाठी स्थापन केलेल्या मसुदा समितीच्या बैठकीसाठी भूपेश बघेल आज दिल्लीला जाणार आहेत. त्यापूर्वीच सीबीआयचे अधिकारी त्यांच्या रायपूर आणि भिलाई येथील निवासस्थानी पोहोचले, अशी माहिती बघेल यांच्या कार्यालयाने X वर पोस्ट करत दिली.

महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून आतापर्यंत सक्तवसुली संचालनालयाने (ED) २,२९५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त तसेच गोठवली आहे. एका कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने १० मार्च रोजी दुर्ग जिल्ह्यातील १४ ठिकाणी छापेमारी केल्यानंतर काही दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आले. ज्यात भूपेश बघेल आणि त्यांचा मुलगा चैतन्य बघेल यांच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आले होते.

'ईडी'ला बघेल यांच्या घरी सापडले होते ३३ लाख

या छापेमारीनंतर बघेल यांनी X वर पोस्ट करत सांगितले होते की ईडीला त्याच्या निवासस्थानी ३३ लाख रुपये रोख सापडली. ही रक्कम शेती, दुग्धव्यवसाय यातून मिळालेले उत्पन्न आणि कौटुंबातील लोकांच्या बचतीतून जमा केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

Mahadev betting app case : काय आहे महादेव बेटिंग ॲप घोटाळा?

महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळा हा छत्तीसगडमधील भिलाई येथील व्यक्तींचा समावेश असलेल्या आणि यूएई तसेच भारतातील विविध राज्यांमधून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कारवायांचे एक नेटवर्क आहे. २०२३ मध्ये छत्तीसगडमधील अनेक छामेमारीच्या कारवाईदरम्यान ईडीने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. ईडीच्या माहितीनुसार, महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप हा एक अनधिकृत प्लॅटफॉर्म होता. ज्या माध्यमातून क्रिकेट आणि फुटबॉलसह विविध खेळांवर तसेच जुगाराच्या इतर प्रकारांवर बेकायदेशीर बेटिंगचा व्यवहार चालवला होता. संपूर्ण भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या या ॲपने झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून अनेकांना आकर्षिक केले होते.

Mahadev betting app case
‘बोफोर्स’ प्रकरणावरून भाजपचा पुन्हा काँग्रेसवर हल्ला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news