कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण; आरोपीची पॉलीग्राफ टेस्ट करण्यास CBI ला परवानगी

Kolkata doctor case | संजय रॉय या प्रकरणातील मुख्य आरोपी
Kolkata doctor case
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण; आरोपीची पॉलीग्राम टेस्ट करण्यास CBI ला परवानगी File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थीच्या बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेल्या संजय रॉयची पॉलीग्राफ चाचणी घेण्यास कोलकाता न्यायालयाने सीबीआयला आज (दि.१९ ऑगस्ट) परवानगी दिली आहे, या संदर्भातील माहिती सीबीआय सूत्रांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या भीषण बलात्कार आणि हत्येचा चार वेगवेगळ्या कोनातून तपास करत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील संजय रॉय हे कोलकाता पोलिसांशी संलग्न असलेले नागरी स्वयंसेवक आहेत.

का केली जाते आरोपीची पॉलीग्राफी चाचणी ?

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफी चाचणी करण्यास सीबीआयने कोलकता उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तपास यंत्रणेच्या मागणीला न्यायालयाने तत्काळ परवानगी दिली आहे. तत्पूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपीची मानसिक चाचणी केली होती. आता पॉलीग्राफी चाचणीद्वारे आरोपी किती खोटे बोलतोय आणि किती सत्य आहे हे कळू शकणार आहे. सीबीआयला रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचीही पॉलीग्राफी चाचणी करायची आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे.

Kolkata Rape-Murder Case | संजय रॉय मुख्य आरोपी

आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बलात्कार-हत्या प्रकरणातील बलात्कार-हत्या प्रकरणातील संजय रॉय हा मुख्य आरोपी असून त्याला पोलिसांनी घटनेनंतर लगेचच अटक केली होती. या प्रकरणाचा तपास कोलकत्ता पोलिसांकडून नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान CBI या प्रकरणाच्या अनेक पातळ्यांवर तपास करत आहे. याआधी आरोपीची मानसिक चाचणी करण्यात आली होती, ज्यामध्ये आरोपीची मानसिक स्थिती ठीक आहे की नाही, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

काय आहे नेमकी घटना?

कोलकातामधील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेजच्‍या सेमिनार विभागात शुक्रवारी, ९ ऑगस्‍ट रोजी पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी ३१ वर्षीय महिला डॉक्‍टरचा रक्तबंबाळ अवस्थेतील अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ (दि.१३) देशभरातील निवासी डॉक्टरांनी बंद पुकारला आहे. पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आलाय. त्यांचा गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यांचा गळा दाबल्याने त्यांची थायरॉईड कास्थी (कूर्चा) ऊती तुटली. तसेच त्यांच्यावर नराधमाने विकृतपणे लैंगिक अत्याचार केल्याने त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खोल जखम आढळून आली असल्याचे चार पानी अहवालात म्हटले आहे. 

पीडितेच्या आईकडून धक्कादायक खुलासा

पीडितेच्या आईने एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या, "आधी आम्हाला हॉस्पिटलमधून तुमची मुलगी आजारी असल्याचा फोन आला, त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. त्यानंतर मी पुन्हा फोन करून काय झाले, असे विचारले. तेव्हा असिस्टंट सुपरवायजरने आम्हाला तुमच्या मुलीने जीवन संपवल्याचे सांगितले. ती गुरुवारी ड्युटीवर गेली, शुक्रवारी सकाळी १०:५३ वाजता आम्हाला फोन आला. आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने आत सोडले नाही. आम्हाला 3 वाजता तिला पाहण्याची परवानगी दिली. यावेळी तिची पँट उघडी होती, अंगावर एकच कपडा होता. तिचा हात मोडला होता, तिच्या डोळ्यातून, तोंडातून रक्त येत होते. नुसतं बघून असं वाटत होतं की कुणीतरी तिचा खून केला आहे. मी त्यांना सांगितले की ही आत्महत्या नाही, खून आहे. आमच्या मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी आम्ही खूप कष्ट केले. पण तिची हत्या झाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news