Colonel Sofiya Qureshi | कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरोधात वक्‍तव्य करणाऱ्या भाजप मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल

Operation Sindoor | जबलपूर कोर्टाचे आदेश
Sofiya Qureshi, Operation Sindoor
Sofiya Qureshifile photo
Published on
Updated on

Colonel Sofiya Qureshi

भोपाळ : ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्‍वाची भूमिका बजावणाऱ्या व देशभरात कौतुकास प्राप्त ठरलेले कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरोधात एका मध्यप्रदशेतातील भाजपच्या मंत्र्यांने वादग्रस्‍त वक्‍तव्य केले होते. याची गंभीर दखल घेत मध्ये प्रदेशातील जबलपूर न्यायालयाने संबधित मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

जबलपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुमोटो ( suo motu )दाखल करुन घेत हा आदेश दिला. भाजपाचे मध्यप्रदेश सरकारमधील भाजपाचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने पुढे म्‍हटले की शहा यांची कुरेशी यांच्या विरोधातील टिप्पणीला अपमानास्पद आणि सांप्रदायिक स्वरूपाची आहे. ज्यामुळे सर्वत्र तीव्र संताप आणि राजकीय प्रतिक्रियेला उमटत आहेत. यामुळे हा गंभीर स्‍वरुपाचा गुन्हा आहे.

Sofiya Qureshi, Operation Sindoor
Lt Colonel Sophia Qureshi | कोण आहेत, ऑपरेशन सिंदूरची कहाणी जगासमोर मांडणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी ?

शहा यांच्या वादग्रस्‍त टिपणीनंतर काँग्रेसने भाजपावर टिकेची झोड उठवली आहे. त्‍यांनी शहा यांच्या प्रतिक्रयेचा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल केला आहे. ‘जिन्होने हमारी बेटीयोंके सिंदूर उजाडे है, हमने उनकी बहण भेज कर के उनकी एैसी की तैसी करवाई है’ अशा पद्धतीचे वादग्रस्‍त विधान करताना विजय शहा या व्हिडीओत दिसत आहेत.

काँगेस अध्यक्ष मल्‍लिकाजूर्न खरगे यांनी तिव्र शब्‍दात निषेध व्यक्‍त करताना म्‍हटले की ‘अंत्‍यत अपमानजनक, लज्‍जास्‍पद व अश्लाघ्‍य भाषा’ ही कर्नल कुरेशी यांच्याबाबतीत वापरली आहे. पहलगाम दहशतवादी हल्‍ला करुन दहशतवाद्यांचे मनसुबे हा भारतात विभाजन करण्याचा होता पण ऑपरेशन सिंदूर ने तो उधळला असेही त्‍यांनी पुढे म्‍हटले आहे.

तसेच ते खर्गे पुढे म्‍हणाले की भाजप व आरएसएसची मानसिकताच स्‍त्रिंयाच्या विरोधातील आहे. पहिल्‍यांदा त्‍यांनी पहलगाममध्ये शहीद झालेल्या नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचा सोशल मीडियावर अपमान केला, नंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या मुलीला सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्रास दिला, आणि आता भाजपचे मंत्री कर्नल सोफिया कुरेशीबद्दल अश्लील आणि अयोग्य वक्तव्य करत आहेत. अशां मंत्र्यांना पंतप्रधान मोदींनी तात्काळ बडतर्फ केले पाहिजे. अशी मागणीही त्‍यांनी केली.

Sofiya Qureshi, Operation Sindoor
Colonel Sofiya Qureshi | 'ऑपरेशन सिंदूर'ची रणनीती सांगणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आहेत बेळगावच्या सून

काँग्रेसकडून गुन्हा दाखल

भाजपाचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधात मध्यप्रदेशचे काँगेस प्रमुख जीतू पटवारी यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्‍यांनी म्‍हटले आहे की पंतप्रधान मोदी यांनी सैन्यदालाच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्‍याचे म्‍हटले आहे. पण त्‍यांच्याच पक्षाचे नेते सैन्यदलातील आपल्‍या भगीनींचा अपमान करतात. यावर का मौन साधले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news