

ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती देताना भारतीय लष्कराच्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी यांची प्रमुख भूमिका होती. त्यांनी जगासमोर भारताच्या कारवाईची माहिती देत भारतातील नारीशक्ती आणि धार्मिक ऐक्य दाखवले.
लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी या भारतीय लष्करातील वरिष्ठ महिला अधिकारी असून, सध्या सिग्नल कोअर विभागात कार्यरत आहेत.
पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी ठिकाणांवर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकची अधिकृत माहिती त्यांनी दिली.
लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी
महिला अधिकारी व्योमिका सिंह
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री
भारताने दोन महिला अधिकाऱ्यांना माहिती देण्याची जबाबदारी देऊन महिलांच्या सामर्थ्याचा जागतिक स्तरावर संदेश दिला.
एका मुस्लिम महिला अधिकाऱ्याची निवड करून भारताने सामाजिक ऐक्याचं आणि सर्वधर्म समभावाचं उदाहरण दिलं.
सोफिया कुरैशी या इंडियन आर्मीच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत, ज्या आर्मीच्या ‘Exercise Force 18’ प्रशिक्षण कार्यक्रमाचं नेतृत्व करीत आहेत.