अभिनेता नागार्जुनवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Nagarjuna News | जनम कोसम मनसाक्षी फाउंडेशनने दाखल केली हाेती तक्रार
Nagarjuna News
अभिनेता नागार्जुनवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?Image source- X
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता नागार्जुन अक्किनेनी उर्फ नागार्जुन याच्याविरोधात आज (दि.५) गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीर जमीन अतिक्रमणाबाबत हैदराबादच्या माधापूर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी जनम कोसम मनसाक्षी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष कासिरेड्डी भास्कर रेड्डी यांनी दाखल तक्रार दाखल केली हाेती, असे 'इंडिया टुडे'ने दिले वृत्तात म्हटले आहे.

तक्रारदार कासिरेड्डी भास्कर रेड्डी यांनी शेकडो कोटींच्या जमिनीवर नागार्जुन यांनी ऑगस्टमध्ये पाडण्यात आलेल्या एन कन्व्हेन्शन सेंटरचे बेकायदेशीरपणे बांधकाम केले आहे. ही वादग्रस्त जमीन थम्मीकुंटा तलावाच्या फुल टँक लेव्हल (FTL) आणि बफर झोनमध्ये येते असल्याचा आरोप केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

अभिनेता नागार्जुन यांनी बेकायदा बांधलेले एन कन्व्हेन्शन सेंटर २४ ऑगस्‍ट २०२४ रोजी बुलडोझरने पाडण्यात आले. कुंता तलावाच्या जमिनीवरील हे बांधकाम बेकायदा असल्याचा राज्य सरकारचा आरोप आहे. हैदराबाद आपत्ती निवारण आणि मालमत्ता संरक्षण यंत्रणेच्या ही धडक कारवाई केली होती. कुंता तलावालगतच्या एन. कन्व्हेन्शन सेंटरवर बुलडोझर चालविण्यात आले. इन्सेट नागार्जुन. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ३ हॉल होते. अनेक भव्य कार्यक्रम इथे होत असत. राजकीय पक्षांचे मेळावे, संघटनांची अधिवेशने, दिमाखदार विवाहसोहळे आदींनी हे सेंटर गजबजलेले असे. एन कन्व्हेन्शन सेंटर दहा एकरमध्‍ये पसरले आहे. येथील बांधकाम जमीन बेकायदा वापर आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्‍याचे तेलंगणा सरकारने स्‍पष्‍ट केले होते.

भगवद्‌गीतेने प्रेरीत होवून कारवाई, सरकारचे स्पष्टीकरण

अधर्माचा पराभव होऊन धर्माचा विजय झाला पाहिजे", अशी भगवान श्रीकृष्णांची शिकवण आहे. आम्‍ही भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाचे पालन करत आहोत. मला लोकांचे भले करायचे आहे. कुंता तलावाच्‍या जमिनीची मुक्तता करणे हा एकमेव उद्देश आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर आम्‍ही कारवाई करुन मागे हटणार नाही, आम्‍ही भगवद्‌गीतेने प्रेरित होऊनच रंगारेड्डी जिल्ह्यातील शिल्पराममजवळील माधापूर हायटेक सिटीलगत बांधलेले एन कन्व्हेन्शन (n convention) सेंटर पाडले आहे," अशा शब्‍दांमध्‍ये तेलंगणाचे मुख्‍यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अभिनेता नागार्जुन यांच्‍या एन. कन्व्हेन्शन सेंटरवरील कारवाईचे समर्थन केले होते.

कुंता तलावाची मुक्तता करणे हा एकमेव उद्देश

नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सरकारच्या ठाम आहे. आम्‍ही भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाचे पालन करत आहोत. दबाव असूनही आमच्या काही मित्रांकडे फार्महाऊस असूनही, HYDRAA ची निर्मिती तलाव आणि सरकारी मालमत्तांच्या रक्षणासाठी करण्यात आली आहे. त्याचा एक भाग म्हणून मला लोकांचे काही भले करायचे आहे. कुंता तलावाची मुक्तता करणे हा एकमेव उद्देश आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना कारवाई करताना आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धारही मुख्‍यमंत्री रेवंत रेड्डी यांनी यावेळी व्‍यक्‍त केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news