Setback For TMC Rebel Faction: तृणमूलच्या बंडखोर गटाला तगडा झटका... HC ने बंद्योपाध्याय यांचे विरोधीपक्षनेतेपद केलं रद्द

Setback For TMC Rebel Faction: तृणमूल काँग्रेस बंडखोर आमदार ऋतब्रत बंद्योपाध्याय यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या विरोधीपक्ष नेते पदाची मान्यता रद्दा करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
Setback For TMC Rebel Faction
Setback For TMC Rebel FactionPUDHARI
Published on: 
Updated on: 

Setback For TMC Rebel Faction: कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्षांच्या ३ जूनचा आदेश रद्द केला आहे. हा तृणमूल काँग्रेस बंडखोर आमदार ऋतब्रत बंद्योपाध्याय यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या विरोधीपक्ष नेते पदाची मान्यता रद्दा करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. जस्टीस कृष्ण राव यांच्या एकल पीठाने विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांना दोन्ही पक्षांचा दाव्यांबाबत पुन्हा विचार करावा आणि १० दिवसांच्या आत नवा निर्णय द्यावा असे निर्देश दिले आहेत.

Setback For TMC Rebel Faction
TMC Meeting | बाळ मृत्यूप्रकरणी डॉक्टरांना निलंबित करा; शिंदे सेनेच्या नगरसेवकांचा महासभेत संताप

बंडखोरांसाठी मोठा कायदेशीर झटका

कोलकाता उच्च न्यायालयाचा हा निर्णय तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटासाठी मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. न्यायालयाने हा आदेश टीएमसीचे वरिष्ठ नेता शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना दिला.

३ जून रोजी स्पीकरने एक आदेश दिला होता. त्यात बंडखोर आमदार ऋतब्रत बंद्योपाध्याय यांना विरोधीपक्ष नेता म्हणून मान्यता देण्यात आली होती. मात्र मूळ टीएमसी पक्षाने या पदासाठी आपला वेगळा उमेदवार निश्चित केला होता. पार्टीकडून शोभनदेव चट्टोपाध्याय यांचे नाव अधिकृतरित्या घोषित केलं होतं. याचा अर्थ स्पीकरने पक्षाकडून अधिकृत जाहीर झालेल्या नावाला बगल देत बंडखोर गटाच्या आमदाराला हे पद दिलं होतं.

Setback For TMC Rebel Faction
TMC tender controversy : टेंडर प्रक्रियेवरील वाद चिघळला

१० दिवसात निर्णय घेण्याचे आदेश

या निर्णयाविरूद्ध शोभनदेव यांनी कोलकाता उच्च न्यायालायत आव्हान दिलं होतं. त्यांचे म्हणणे होते की स्पीकरला पार्टीकडून देण्यात आलेल्या अधिकृत नावाला बायपास करण्याचा अधिकार नाही. या प्रकरणात जस्टीस कृष्ण राव यांच्या एक सदस्यीय पीठाने ३ जून रोजी देण्यात आलेला आदेश रद्द केला. त्याचबरोबर स्पीकर रथींद्र बोस यांना दोन्ही पक्षांच्या दाव्यांचा पुन्हा विचार करून १० दिवसात निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

Setback For TMC Rebel Faction
TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्‍या नाव- चिन्ह वादावर होणार चार महिन्यांत निर्णय; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश

या निर्णयामुळे आता ऋतब्रत बंद्योपाध्याय यांचे विरोधीपक्ष नेतेपदाची मान्यता संपुष्टात आली आहे. न्यायालयाने हे पद कोणाला मिळावे याबाबत कोणता निर्णय दिलेला नाही. आता हा निर्णय स्पीकरला करायचा आहे. त्यामुळे बंगालच्या राजकारणात पुढचे १० दिवस महत्वाचे असणार आहे. आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.