

Infant Death Case Thane
ठाणे : बाळकुम येथील आरोग्य केंद्रात गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिच्या पोटातील आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत शिंदेच्या शिवसेना नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत प्रशासनाला धारेवर धरले. महिला डॉक्टर उपस्थित नव्हत्या, रुग्णाची तपासणी झाली नाही, वैद्यकीय कागदपत्रे न पाहताच उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे आरोप यावेळी शिंदे सेनेचे नगरसेवक संजय भोईर आणि उषा भोईर यांनी केला.
संबंधित दोन्ही डॉक्टरांना तातडीने निलंबित करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला. दुसरीकडे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील भोंगळ कारभार आणि आरोग्य यंत्रणेतील अनागोंदीचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या महासभेत चांगलाच गाजला.
शुक्रवारी झालेल्या महासभेत नगरसेवक भोईर यांनी या प्रकरणावरून प्रशासनाची कोंडी केली. गर्भवती महिलेला योग्य उपचार मिळाले नाहीत. संबंधित वेळी महिला डॉक्टरही उपस्थित नव्हत्या. वैद्यकीय कागदपत्रे न तपासताच उत्तरे दिली जात आहेत. एवढी गंभीर घटना घडूनही प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे संबंधित दोन्ही डॉक्टरांना निलंबित करून त्यांची बदली करावी, अशी मागणी त्यांनी केली. कारवाई झाली नाही तर आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शुक्रवारी झालेल्या महासभेत नगरसेवक भोईर यांनी या प्रकरणावरून प्रशासनाची कोंडी केली. गर्भवती महिलेला योग्य उपचार मिळाले नाहीत. संबंधित वेळी महिला डॉक्टरही उपस्थित नव्हत्या. वैद्यकीय कागदपत्रे न तपासताच उत्तरे दिली जात आहेत. एवढी गंभीर घटना घडूनही प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे संबंधित दोन्ही डॉक्टरांना निलंबित करून त्यांची बदली करावी, अशी मागणी त्यांनी केली. कारवाई झाली नाही तर आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
उषा भोईर यांनीही रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेजबाबदार कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला. रुग्णाच्या नातेवाइकांना विश्वासात घेतले जात नाही. कागदपत्रे न तपासताच उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. बाळ दगावले, तरी डॉक्टर जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत. रुग्णाची तपासणीच होत नसेल तर उपचारांची जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुधीर भगत यांनीही संबंधित डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली.
केवळ गभार्तील बाळाच्या मृत्यूचे प्रकरणच नव्हे, तर यावेळी कळवा रुग्णालय, कौसा, कोपरी प्रसुती गृहासह पालिका रुग्णालयातील अनेक गंभीर प्रश्नही नगरसेवकांनी महासभेत मांडले. प्रियंका पाटील यांनी कळवा रुग्णालयातील क्लास फोर कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन थकविण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. भरत चव्हाण यांनी एनआयसीयू विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन, रुग्णवाहिकांची अनुपलब्धता आणि ओपीडीच्या विस्कळीत नियोजनावर प्रशासनाला जाब विचारला.
कोपरी प्रसूतिगृहाची सुविधा चांगली असली, तरी ओपीडीचे वेळापत्रक आणि नियोजन नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले. सेहर शेख यांनी कौसा रुग्णालयातील आयसीयू आणि एनआयसीयू विभाग अद्याप सुरू नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. सुविधा उपलब्ध असूनही त्या वापरात नसतील तर त्याचा उपयोग काय, असा सवाल करत हे विभाग तातडीने सुरू करण्याची मागणी केली. रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
सुरेश कांबळे यांनी कळवा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांचा पाढाच वाचला. ठाण्याबाहेरील रुग्णांचाही मोठा भार या रुग्णालयावर पडत असल्याने ठाण्यातील रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. एक्स-रे मशीन बंद, आयसीयू बेड अपुरे आणि औषधांचा तुटवडा अशी परिस्थिती आहे. तब्बल ३०० प्रकारची औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जाते, असा आरोप त्यांनी केला.
मालती पाटील यांनी कोपरी येथील प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावतीवर प्रश्न उपस्थित केला. काहींना १८ हजार, तर काहींना ११ हजार रुपये मानधन दिले जाते. हा दुजाभाव कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. या आरोपांवर उत्तर देताना ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी संबंधित दोन्ही डॉक्टरांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. हलगर्जीपणा आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. डॉक्टरांच्या बदल्या रोटेशननुसार करण्यात येतील. नेमके काय घडले आणि त्यामागील कारणे काय आहेत, याची माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.