UP News
UP Newsfile photo

UP News : बुलंदशहरमध्ये भीषण अपघात; भाविकांच्या ट्रॅक्टरला कंटेनरची धडक, ८ ठार, ४० जखमी

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे राष्ट्रीय महामार्ग ३४ वर एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला.
Published on

UP Bulandshahr accident

बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे सोमवारी राष्ट्रीय महामार्ग ३४ वर भीषण अपघात झाला. राजस्थानमधील गोगामेडी येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला एका भरधाव कंटेनरने मागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन मुलांसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४० जण गंभीर जखमी झाले आहेत.

बुलंदशहरचे पोलीस अधीक्षक डॉ. तेजवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कासगंज जिल्ह्यातील सोरो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रफायदपूर गावचे सुमारे ६० भाविक रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातील प्रसिद्ध गोगामेडी मंदिराच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांचा ट्रॅक्टर बुलंदशहरच्या अरनिया पोलीस ठाणे क्षेत्रातील घटाल गावाजवळ पोहोचला असता, मागून वेगाने आलेल्या एका कंटेनर ट्रकने ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रॉलीमध्ये बसलेले सर्व भाविक हवेत फेकले जाऊन रस्त्यावर पडले.

पोलिसांकडून तातडीने मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सरकारी रुग्णवाहिका आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना खुर्जा येथील कैलास रुग्णालय, मुनी सामुदायिक आरोग्य केंद्र आणि जटिया रुग्णालयात दाखल केले. बुलंदशहरचे एसएसपी दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले की, ट्रॅक्टरमध्ये ५० ते ६० भाविक होते आणि हे सर्वजण जाहरवीर (गोगाजी) यांच्या दर्शनासाठी गोगामेडीला जात होते.

मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश

जखमींपैकी २९ जणांना कैलास रुग्णालयात, १८ जणांना मुनी आरोग्य केंद्रात आणि १० जणांना जटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान कैलास रुग्णालयात डॉक्टरांनी दोन मुलांसह सहा जणांना मृत घोषित केले, तर मुनी आरोग्य केंद्रात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेमुळे रफायदपूर गावावर शोककळा पसरली असून, पोलीस कंटेनर चालकाचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news