Budget 2024 : नोकरदार महिलांसाठी आनंदाची बातमी; ३ लाख कोटींची तरतूद

नोकरदार महिला, मुलींसाठी मोठी घोषणा
nirmala sitharaman budget 2024
नोकरदार महिलांसाठी आनंदाची बातमी; मुलींच्या योजनेसाठी ३ लाख कोटीFile Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : Women empowerment schemes in Union Budget 2024-25 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (दि.२३) अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थ संकल्पातून त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसह नोकरदार महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. जाणून घेवूयात त्याबद्दल...

नोकरदार महिलांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

आज सादर केलेल्या अर्थ संकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येतील अशी घोषणा केली. अशा सुविधांमुळे नोकरदार महिलांच्या संख्येत वाढ होईल. यातून त्यांना प्रोत्साहन मिळेल. सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी राबवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल. असे यावेळी सीतारामन यांनी सांगितले. तसेच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारच्या माध्यामातून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news