BrahMos missile Tejas integration- ब्राह्मोस अत्याधुनिक होणार; 'तेजस'मधूनही डागणे शक्य

ब्राह्मोस अत्याधुनिक होणार; 'तेजस'मधूनही डागणे शक्य
BrahMos missile Tejas integration- ब्राह्मोस अत्याधुनिक होणार; 'तेजस'मधूनही डागणे शक्य
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमातून विकसित होणाऱ्या प्रसिद्ध 'ब्राह्मोस' सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची न अधिक अत्याधुनिक आवृत्ती 'ब्राह्मोस-एनजी' लवकरच प्रत्यक्षात येत आहे. ब्राह्मोस एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक जयतीर्थ जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रगत क्षेपणास्त्राचा पहिला प्रोटोटाइप २०२७ किंवा २०२८ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.

सध्याच्या ब्राह्मोसच्या तुलनेत ब्राह्मोस-एनजी आकाराने अधिक लहान आणि वजनाने अत्यंत हलके असेल. याचे वजन सुमारे १.२ ते १.५ टन आणि लांबी ६ मीटरपेक्षा कमी असेल. हलक्या वजनामुळे आणि आधुनिक कंपोझिट मटेरियलच्या वापरामुळे हे क्षेपणास्त्र सुखोई-३० एमकेआय सोबतच भारताच्या हलक्या 'एलसीए तेजस' लढाऊ विमानावरही सहज तैनात करता येईल. हे क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे साडेतीन पट जास्त (मॅक ३.५) वेगाने लक्ष्यभेद करण्यास सक्षम असेल. लखनऊ येथील नवीन कारखान्यातून २०२७-२८ पर्यंत याचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.

BrahMos missile Tejas integration- ब्राह्मोस अत्याधुनिक होणार; 'तेजस'मधूनही डागणे शक्य
High Court: पतीचे अनैतिक संबंध म्हणजे क्रूरता नव्हे; मद्रास उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

भविष्यातील धोरणात्मक गरजा लक्षात घेऊन ब्राह्मोस एरोस्पेस तब्बल १,५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या संकल्पनेवरही काम करत आहे. यामुळे भारतीय सैन्यदलांना सीमेपलीकडे खोलवर मारा करण्याची ताकद मिळेल.

BrahMos missile Tejas integration- ब्राह्मोस अत्याधुनिक होणार; 'तेजस'मधूनही डागणे शक्य
Jamia protest: जामिया विद्यापीठात १३ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे उपोषण; 'फ्री काश्मीर'च्या घोषणांवरून तणाव; काय आहेत मागण्या?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news