आधार आणि पॅन तपशील उघड करणारे संकेतस्थळ ब्लॉक

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची कारवाई
Aadhar Pan Link
आधार आणि पॅन तपशील उघड करणारे संकेतस्थळ ब्लॉकPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

काही संकेतस्थळ भारतीय नागरिकांच्या आधार आणि पॅन कार्ड तपशीलांसह संवेदनशील वैयक्तिक माहिती उघड करत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निदर्शनास आले. त्यानंतर ही संकेतस्थळे ब्लॉक करण्याची कारवाई तत्काळ करण्यात आली. भारत सरकार सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेटसाठी कटीबद्ध असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

Aadhar Pan Link
अर्थज्ञान : आधार कार्डद्वारे मिळवा ई-पॅन, जाणून घ्या प्रक्रिया

भारत सरकारसाठी सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे, सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधारशी संबंधित कलम २९(४) अंतर्गत या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, सरकारच्या वतीने माहिती तंत्रज्ञान सचिवांना माहितीच्या गोपनीयतेच्या उल्लंघनासाठी तक्रार करणे आणि नुकसान भरपाई देण्याचे अधिकार दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news