अर्थज्ञान : आधार कार्डद्वारे मिळवा ई-पॅन, जाणून घ्या प्रक्रिया

अर्थज्ञान : आधार कार्डद्वारे मिळवा ई-पॅन, जाणून घ्या प्रक्रिया
Published on
Updated on

आपल्याला बँक खाते उघडायचे असेल किंवा मालमत्ता खरेदी करायची असेल, अशा सर्व आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. हे महत्त्वाचे दस्तऐवज हरवले किंवा तुटले तर घाबरून जाण्याची गरज नाही.

आधार कार्डप्रमाणेच पॅन असणे हादेखील ओळखीचा मोठा पुरावा आहे. अशा स्थितीत हे महत्त्वाचे दस्तऐवज हरवले किंवा तुटले, तर घाबरून जाण्याची गरज नाही आणि कार्यालयात हेलपाटे मारण्याचीही गरज नाही. फक्त 10 मिनिटांत घरी बसून ते मिळवता येते. त्याची प्रक्रियादेखील खूप सोपी असून, ती निःशुल्क आहे.

 ऑफलाइन प्रक्रिया वेळखाऊ

 पॅनकार्ड हरवल्यास किंवा तुटल्यास, आयकर विभागाने ई-पॅन बनवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नवीन पॅन डाऊनलोड करण्याचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त 10 मिनिटांचा वेळ द्यावा लागेल आणि तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या मदतीने तुमचे ई-पॅनकार्ड त्वरित तयार करू शकता. वास्तविक, पॅनकार्ड बनवण्याच्या ऑफलाइन प्रक्रियेत लागणार्‍या दीर्घ कालावधीपासून लोकांना दिलासा देण्यासाठी आयकर विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. साधारणपणे, ऑफलाइन पॅन कार्डसाठी अर्ज, पडताळणी आणि इतर प्रक्रियांसाठी सुमारे दोन आठवडे लागतात. ऑफलाइन ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्याच ई-पॅन काढून घ्या.

आधार कार्डद्वारे ई-पॅन मिळवा

पॅनकार्ड हरवल्यास किंवा तुटल्यास नागरिकांचे कोणतेही कामात अडथळा येऊ नये यासाठी ई पॅन सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. हे ऑनलाइन पॅन कार्ड मिळविण्यासाठी तुमच्याकडे वैध आधार क्रमांक असणे आवश्यक आहे आणि तुमचे आधार कार्ड पॅन आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. ई-पॅन फक्त आधार कार्डद्वारे तुम्ही नवीन पॅनकार्ड मिळवू शकता. त्यात दिलेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.

ई-पॅन हे डिजिटल स्वाक्षरी केलेले कार्ड आहे, जे आधारवरून ई-केवायसी माहितीच्या पडताळणीनंतर जारी केले जाते. हे मिळवण्यासाठी, आधार कार्डमध्ये (आधार कार्ड तपशील) दिलेली सर्व माहिती जसे की नाव, जन्मतारीख, लिंग, सर्व बरोबर असणे महत्त्वाचे आहे. ई-पॅन आणि आधारची माहिती एकमेकांशी जुळली पाहिजे. पडताळणीनंतर, तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येतो, तो प्रविष्ट केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होते.

ई-पॅनकार्ड असे डाऊनलोड करा

ई-पॅनकार्डसाठी विनंती केल्यानंतर ते डाऊनलोड करण्याची वेळ येते, त्यामुळे ही प्रक्रियादेखील खूप सोपी आहे. तुमचा यूजर आयडी आणि पासवर्डसह ई- फायलिंग लॉग इन करा. त्यानंतर डॅशबोर्डवरील सर्व्हिस ई-पॅन पहा/डाऊनलोड पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक विचारला जाईल, तो एंटर करा आणि कंटिन्यू पर्यायावर क्लिक करा. तुम्ही हे करताच, तुम्हाला तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी प्राप्त होईल, जो एंटर केल्यानंतर तुम्ही तुमचे पॅनकार्ड डाऊनलोड करू शकता आणि आवश्यक तेथे वापरू शकता.

ई-पॅनसाठीची प्रक्रिया पहा

  • आयकर विभागाच्या पोर्टलवर लॉग इन करा. (https://www.incometax.gov.in/iec/foportal/)
  • त्यानंतर इन्स्टंट ई-पॅन ऑप्शनवर क्लिक करा. पुन्हा गेट न्यू ई-पॅनवर क्लिक करा.
  • नवीन ई-पॅन पृष्ठावर आधार क्रमांक प्रविष्ठ केल्यानंतर कन्फर्म चेकबॉक्स निवडा आणि 'सुरू ठेवा'वर क्लिक करा.
  • ओटीपी प्रमाणीकरण पृष्ठावर 'मी अटी वाचल्या आहेत आणि पुढे जाण्यास सहमत आहे'वर क्लिक करा.
  • आता आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर 6 अंकी ओटीपी येईल, तो टाका.
  • आधार तपशील सत्यापित करण्यासाठी चेकबॉक्स निवडा आणि 'सुरू ठेवा'वर क्लिक करा.
  • प्रमाणीकरण आधार तपशील पृष्ठावर, 'मान्य आहे'पर्याय निवडा आणि 'सुरू ठेवा' क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक सक्सेसफुलचा मेसेज येईल, त्यात दिलेला पोचपावती आयडी लिहून ठेवा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news