शाळेच्या भरभराटीसाठी काळी जादू, व्यवस्थापकाने घेतला चिमुरड्याचा बळी

Hathras Crime News | नरबळीच्या घटनेने उत्तर प्रदेश हादरला
Hathras Crime News
शाळेच्या भरभराटीसाठी काळी जादू, व्यवस्थापकाने घेतला चिमुरड्याचा बळीFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका शाळेतील धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील शाळेच्या व्यवस्थापकानेच इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या केली आहे. शाळेची भरभराट व्हावी म्हणून शाळा व्यवस्थापकानेच हे अघोरी वृत्त केल्याची बातमी 'इंडिया टुडे'ने दिले आहे.

शाळेच्या व्यवस्थापकाचे वडील तांत्रिक आहेत. व्यवस्थापकाच्या वडिलांचा असा विश्वास होता की, तंत्र मंत्र आणि त्यागामुळे मुलाच्या शाळेची प्रगती होईल. त्यामुळे त्याने इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याची हत्या करून या धारणेसाठी बळी घेतला. यानंतर व्यवस्थापक आपल्या गाडीतून विद्यार्थ्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार होते. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या गाडीतून विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी विद्यार्थ्याच्या हत्येचा उलगडा केला असून व्यवस्थापक आणि त्याच्या वडिलांसह ५ जणांना अटक केली आहे.

शाळा व्यवस्थापनाकडून मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची दिशाभूल

इयत्ता दुसरीमधील 11 वर्षांचा विद्यार्थी, कृतार्थ हा रा. चुरसेन, ठाणे चांदपा येथील रहिवासी होता. परिसरातील रासगवान गावातील डीएल पब्लिक स्कूल निवासी शाळेत तो शिकत होता. सोमवारी (दि.२३ सप्टेंबर) सकाळी शाळेचे व्यवस्थापक दिनेश बघेल यांनी कृतार्थची तब्येत खराब असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. यानंतर कुटुंबीय शाळेत पोहोचले असता त्यांना कृतार्थ सापडला नाही. वसतिगृह संचालक दिनेश बघेल यांना संबंधित विद्यार्थ्यांबद्दल विचारले असता त्यांनी त्यांची दिशाभूल केली. कृतार्थला उपचारासाठी घेऊन गेल्याचे ते सांगत राहिले. काही पोलिसांनी दिनेश बघेलला त्याच्या कारसह सादाबादजवळ पकडले. कारच्या मागच्या सीटवर विद्यार्थी कृतार्थचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

एसपी कार्यालयाला घेराव

खून प्रकरणातील तपासाच्या मागणीसाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी एसपी कार्यालयाला घेराव घातला होता. विद्यार्थ्याच्या हत्येच्या घटनेटचा लवकरात लवकर तपास करण्याची मागणी कुटुंबीयांनी एसपी हाथरस यांच्याकडे केली होती. यावेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्याचवेळी, पोलीस अधिकाऱ्यांनी एसपी कार्यालयाला घेराव घातल्यानंतर अवघ्या काही तासांनी हा प्रकार उघडकीस आला.

शाळा संचालकालह ५ जणांवर गुन्हा दाखल

यानंतर कृतार्थचे वडील कृष्णा यांनी शाळेचे संचालक दिनेश बघेल यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी विद्यार्थी कृतार्थचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात विद्यार्थ्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या मानेवर जखमेच्या खुणा असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत उघड केले आहे.

पोलिसांनी दिली माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा व्यवस्थापकाचे वडील जशोधन भगत हे तंत्र मंत्राचे पालन करायचे. या तंत्रमंत्र आणि त्यागामुळे त्यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थी कृतार्थची हत्या केली. तंत्र-मंत्राचा वापर करून मुलाचा बळी दिल्यास आपली शाळा आणि व्यवसाय चांगला होईल, अशी त्यांचा समज होता. त्यामुळेच व्यवस्थापक दिनेश बघेल आणि त्याचे वडील जशोधन यांनी हा खून केला. यापूर्वीही या लोकांनी असा प्रकार घडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना यश आले नव्हते, असे देखील पोलिसांनी सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news