फटाके फोडल्याने आजार बरे होतात, पश्चिम बंगालमधील भाजप आमदारांचे वक्तव्य, टीकेनंतर म्हणाल्या..

दिल्ली-एनसीआरसह देशभरात वायुप्रदूषणाची पातळी वाढत असताना त्यांच्या या विधानावर जोरदार टीका झाली.
फटाके फोडल्याने आजार बरे होतात, पश्चिम बंगालमधील भाजप आमदारांचे वक्तव्य, टीकेनंतर म्हणाल्या..
फटाके फोडल्याने आजार बरे होतात, पश्चिम बंगालमधील भाजप आमदारांचे वक्तव्य, टीकेनंतर म्हणाल्या..file photo
Published on: 
Updated on: 

bjp west bengal mla papiya adhikari on her remarks about diwali firecrackers cure illness

पुढारी ऑनलाईन : ‘फटाके फोडल्याने अनेक आजार बरे होतात’, असे विधान करून पश्चिम बंगालमधील भाजप आमदार पापिया अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. दिल्ली-एनसीआरसह देशभरात वायुप्रदूषणाची पातळी वाढत असताना त्यांच्या या विधानावर जोरदार टीका झाली. त्यांच्या दाव्याच्या वैज्ञानिक सत्यतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर आता भाजप आमदारांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे.

फटाके फोडल्याने आजार बरे होतात, पश्चिम बंगालमधील भाजप आमदारांचे वक्तव्य, टीकेनंतर म्हणाल्या..
Alcohol: दारूच्या खपात भारत जगाच्या पुढे! अमेरिका आणि चीनलाही टाकले मागे; 'या' मद्याला सर्वाधिक मागणी

अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास केलेल्या पापिया अधिकारी यांना त्यांच्या वादग्रस्त विधानाबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी हसत उत्तर दिले. माध्यमांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप करत आपण केवळ पूर्वजांच्या एका म्हणीचा संदर्भ दिला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. ताळीगंज मतदारसंघातून आमदार झालेल्या पापिया अधिकारी यांनी हिंदीतून आपली भूमिका मांडली.

त्या म्हणाल्या, "नाही, नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही. माध्यमांचे लोक याचा काय अर्थ काढत आहेत, हे मला माहीत नाही. असे करायला नको. ही आपल्या पूर्वजांची एक म्हण होती. वास्तविक, हा दिव्यांचा सण आहे. दिवे लावण्याचा हा उत्सव आहे. समाजातील वाईट गोष्टी नष्ट करण्याचा हा काळ असतो."

फटाके फोडल्याने आजार बरे होतात, पश्चिम बंगालमधील भाजप आमदारांचे वक्तव्य, टीकेनंतर म्हणाल्या..
Goa Temperature Update| गोव्यात उष्णतेची तीव्रता वाढणार; 14 ते 19 नोव्हेंबरदरम्यान तापमान 38 अंशांपर्यंत जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पुढे त्या म्हणाल्या, "पूर्वी यज्ञ केले जात असत किंवा दिवे लावून अनेक गोष्टी नष्ट केल्या जात असत."

'विज्ञानाच्या युगात असे बोलणे योग्य नाही'

विज्ञानाने एवढी प्रगती केलेली असताना अशा प्रकारची विधाने करणे योग्य नसल्याचेही पापिया अधिकारी यांनी मान्य केले. त्या म्हणाल्या, "आता फटाक्यांचे युग आले आहे. विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात असे बोलणे योग्य नाही." तसेच, आपल्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आपण माफी मागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कालीपूजेच्या वेळी केले होते वादग्रस्त विधान

यापूर्वी पश्चिम बंगालमधील एका कालीपूजा मंडपाच्या उद्घाटनावेळी भाजप आमदार पापिया अधिकारी यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. कार्यक्रमात त्या बोलत असताना त्यांच्या समोरच एक फटाका फुटला. त्यावेळी बंगाली भाषेत बोलताना त्या म्हणाल्या होत्या, "आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की आपण फटाके फोडणार आहोत. फटाक्यांशिवाय कालीपूजा कशी पूर्ण होऊ शकते? आपण नक्कीच फटाके फोडणार आहोत. मात्र, पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करू."

याचवेळी त्यांनी, "तुम्ही पाहाल की फटाके फोडल्याने अनेक आजार बरे होतील," असेही म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

फटाक्यांबाबत शुभेंदू अधिकारी काय म्हणाले?

दरम्यान, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी सोमवारी यंदा दिवाळीच्या दिवशी राज्यातील ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात नियंत्रणात राहिल्याचा दावा केला. फटाके फोडण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी या तक्रारी डाव्या पक्षांकडून केल्या जात असल्याचा आरोप केला.

पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील दीघा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी नागरिकांना हरित फटाके फोडून दिवाळी साजरी करण्याची परवानगी दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले. शुभेंदू अधिकारी म्हणाले, "लोक दिवाळी साजरी करणार आणि हरित फटाकेही फोडणार. यात एवढी अडचण काय आहे? त्यामुळे नेमके काय नुकसान होणार आहे?"

यावेळी त्यांनी डाव्या विचारसरणीच्या टीकाकारांवर हिंदूंचे धार्मिक सण केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते मर्यादित ठेवण्याचा आणि धार्मिक परंपरांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.