Bihar Politics : बिहारमधील अभूतपूर्व विजयानंतर भाजप 'ॲक्‍शन मोड'मध्‍ये, बंडखोरांवर धडक कारवाई

माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्‍यासह भाजपने अन्‍य दोघांना पक्षातून केले निलंबित
Bihar Politics
माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंहा.File Photo
Published on
Updated on

BJP RK Singh Suspension: बिहार विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपने पक्षातील बंडखोर नेत्यांवर धडक कारवाई केली आहे. राज्‍यातील प्रमुख नेते आरके सिंह यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. आरा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आरके सिंह यांच्यावर पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. सिंह यांच्याव्यतिरिक्त, भाजपने विधान परिषद आमदार अशोक कुमार अग्रवाल आणि कटिहारच्या महापौर उषा अग्रवाल यांनाही अशाच आरोपांमुळे निलंबित करण्‍यात आले आहे.

पक्षाने बजावली कारणे दाखवा नोटीस

भाजपने जारी केलेल्या अधिकृत पत्रात म्हटले आहे की, "तुमची कारवाई पक्षाविरुद्ध आहे. हे शिस्तीच्या कक्षेत येते. पक्षाने हे गांभीर्याने घेतले आहे. यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे. तुम्हाला पक्षातून निलंबित केले जात आहे आणि तुम्हाला पक्षातून का काढून टाकू नये, याची कारणे विचारण्यात आली आहेत. कृपया हे पत्र मिळाल्यापासून एका आठवड्यात तुमची भूमिका स्पष्ट करा."

आरके सिंह यांच्यावर कारवाई का?

माजी केंद्रीय मंत्री आणि आरा येथील माजी खासदार आरके सिंह यांनी लोकांना त्यांच्याच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) काही उमेदवारांना मतदान करू नका असे आवाहन केले होते. सिंह यांनी सोशल मीडियावर एनडीए उमेदवारांवर निशाणा साधत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. व्हिडिओमध्ये सिंह म्हणाले होते की, "मी तुम्हाला विनंती करतो की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा भ्रष्ट व्यक्तींना, त्यांची जात किंवा समुदाय काहीही असो, मतदान करू नका. आपण गुन्हेगारांना निवडून दिले तर बिहारमध्ये गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार पसरत राहील आणि विकासाचे स्वप्न कधीही साकार होणार नाही. बिहारचा कधीही विकास होणार नाही."

Bihar Politics
Sunjay Kapur Assets Case : “मुलीची फी भरलेली नाही"! अभिनेत्री करिश्मा कपूरचा दावा; हायकोर्टने फटकारले,“मेलोड्रामा थांबवा!”

सम्राट चौधरींवरही केला होता हल्लाबोल

या व्हिडिओमध्ये आर के सिंह यांनी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजपचे तारापूर येथील उमेदवार सम्राट चौधरी यांच्यावर एका पक्षाने उघडपणे खून आणि जामिनावर असताना त्यांचे वयाचे प्रमाणपत्र बनावट बनवल्याचा आरोप केला. विधानसभा प्रचार काळात जन सुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी याच आरोपांवर सम्राट चौधरी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news