Haryana Election Result | हरियाणात मोठा उलटफेर! भाजप 'हॅट्‌ट्रिक'च्या दिशेने

सुरुवातीला काँग्रेसची आघाडी, पण लगेच चित्र बदलले....
Haryana Election Result
पंतप्रधान नरेंद्र मोदी.(Image source- pti)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणात भाजपची (Haryana Election Result) 'हॅट्‌ट्रिक'च्या दिशेने वाटचाल सुरु आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निवडणूक आयोगाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने ४९ जागांवर आघाडी घेतली होती. तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. तर अपक्षांनी ४ जागांवर आघाडी घेतली आहे.

सुरुवातीला काँग्रेसची आघाडी, पण लगेच चित्र बदलले....

हरियाणात सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेसने आघाडी घेतली होती. पण थोड्याच वेळात चित्र बदलले आणि काँग्रेस आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर दिसून आली. पण त्यानंतर भाजपने ४९ जागांवर आघाडी घेतली. ९० जागा असलेल्या हरियाणा विधानसभेत बहुमताचा आकडा ४६ आहे. सध्या तरी भाजपने बहुमतांहून अधिक जागांवर आघाडी घेतल्याचे दिसते.

हरियाणात भाजप गेली १० वर्षे सत्तेत

हरियाणात भाजप गेली १० वर्षे सत्तेत आहे. आता त्यांनी तिसऱ्यांदा सत्तेच्या दिशेने वाटचाल केली आहे. २०१९ मधील हरियाणातील निवडणुकीत भाजपने ४० जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने ३१ आणि जननायक जनता पक्षाने (JJP) १० जागा मिळवल्या होत्या. भाजपने जननायक जनता पक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. तर दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री बनले होते. पण नायब सिंह सैनी मुख्यमंत्री झाल्यावर ही युती संपुष्टात आली होती.

एक्झिट पोलचे निकाल काय होते?

एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेस ५५ जागा जिंकेल, तर भाजप २६ जागांवर विजयी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. "गेल्या १० वर्षात हरियणात आम्ही अनेक विकासकामे केली आहेत," असे सैनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

Haryana Election Result
Haryana Election 2024 | हरियाणात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news