ATM salon | ATM मध्येच थाटले सलून, लोक पैसे काढण्यासाठी नाही तर केस कापण्यासाठी येतात, बिहारमधील एटीएम सलून व्हायरल

ATM सलूनवाला सोशल मिडीयावर व्हायरल, बँकेला आली चूक लक्षात तत्‍काळ दुकानवरील बोर्ड हटवला
ATM sloon | ATM मध्येच थाटले सलून
ATM sloon | ATM मध्येच थाटले सलून
Published on
Updated on

ATM sloon | कोणत्‍या ना कोणत्‍या गोष्टीने चर्चेत असलेल्या बिहारमध्ये आता एक नवीन गोष्ट चांगलीच चर्चेत आली आहे. तीम्हणजे एका SBI बँकेच्या ATM मध्येच एक सलून सुरु करण्यात आले आहे. हे सलून आणि सलूनवाला चांगलाचा व्हायरल झाला आहे. पण SBI बँकेच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट समजल्यावर मात्र त्‍यांनी आता. त्‍या दुकानावरील बोर्ड तसेच शटरवीरल बँकेचा लोगो हटवला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की पाटणापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दानापूरमधील येथील एका जुन्या एसबीआय एटीएम बूथचे सलूनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. लोक एटीएम पाहून पैसे काढण्यासाठी आल्यावर त्‍यांची गफलत होते. खराब झालेले मशीन काढून टाकल्यानंतर आणि नवीन एटीएम बसवण्यात अपयश आल्याने, घरमालकाने ती खोली भाड्याने दिली.पण या बूथवरील बँकेचा लोगो तसाच राहिला त्‍यामुळे लोक पैसे काढण्यासाठी नाही तर एटीएम मध्ये केस कापण्यासाठी येतात असे दिसत होते. चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे एटीएम पूर्वी एसबीआयचे होते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी हे मशीन नादुरुस्त झाले होते, त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी ते काढून नवीन एटीएम बसवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नवीन मशीनही बराच काळ बसवण्यात आले नाही. ती जागा कित्येक महिने रिकामी होती, म्हणून त्यांनी ती जागा सलून चालकाला भाड्याने दिली. सलूनवाल्याने बोर्ड आहे तसा ठेवून आतिल बाजूस दुकान सुरु केले. त्‍यानंतर ते चांगलेच व्हायरल झाले.

घरमालक एस. के. सिन्हा यांनी सांगितले की, त्यांनी ही जागा काही वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाला भाड्याने दिली होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी, बँकेच्या अधिकाऱ्यांनी खराब झालेले एटीएम मशीन काढून टाकले आणि लवकरच नवीन मशीन बसवण्याचे आश्वासन दिले. मात्र, इतका वेळ उलटूनही, ना नवीन एटीएम बसवण्यात आले, त्‍यामुळे जागा सलूनला भाड्याने दिली

सलून एटीएम व्हायरल

एटीएम बूथमध्ये खुर्च्यांवर बसून लोक आपले केस आणि दाढी कापून घेत असल्याचे पाहून स्थानिक लोक चकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, हे "सलून एटीएम" संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनले होते.

बँकेने काढला बोर्ड

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बँकेला आपली चूक कळली. त्‍यांनी तत्‍काळ ॲक्शन घेत या बूथवरील SBI ATM हा बोर्ड काढून टाकला, त्‍याचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news